मनाली ते लेह सायकलिंग ने 10 दिवस प्रवास पूर्ण करणारे – गिरीष येवते चे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 मुखेड : पवन जगडमवार
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरूवार दि 1 ऑगस्ट रोजी कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे महसूल दिन साजरा करण्यात आले सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मनपाचे आयुक्त लहुराज माळी हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक आशिष ठाकरे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे होते.  तसेच यावेळी अपर जिल्हाधिकारी, किनवट अभिनव गोयल यांची उपस्थिती होती.
             सदर कार्यक्रमात महसूल विभागामार्फत सन 2018-2019 या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकाय्राचे गौरव करण्यात आले होते यावेळी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागा अंर्तगत अवल कारकून पदावर विराजमान असलेले कर्मचारी मुखेड तालुक्यातील आंबुलगा नगरीचे भूमिपुत्र श्री गिरीष वसंतराव येवते हे शिमला येथे जाऊन मनाली ते लेह खार्दुकला हे जगातील दुसय्रा क्रमांकाचे उंच ठिकाण असून या ठिकाणी जाऊन त्यांनी 550 किलोमीटर  10 दिवसात सायकलिंग ने प्रवास पूर्ण केल्याबद्दल गिरीष वसंतराव येवते यांचे नांदेड येथे 1 ऑगस्ट 2019 रोजी महसूल दिन निमित्त जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते गिरीश वसंतराव येवते यांचे सत्कार करून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले होते त्यामुळे आंबुलगा गावातील नागरिकांनी व मित्र, परिवाराच्या वतीने कृर्षी सहाय्यक प्रल्हाद येवते, पत्रकार पवन जगडमवार, ग्रामसेवक मनिष येवते अदीने त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे