जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो — युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद :- दत्ता पाटील मालेगावे 
          खरी जर पुजा करायची असेल तर दिनदुबळ्यासह शेतकऱ्यांची सेवा करा आसे माझे आजोबा शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांनी सांगीतले आहे यासाठी मी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातुन तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे आसे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
       लोकसभा निवडनूकीत ज्यानी शिवसेना पक्षला मतदान केले अशा मतदार बांधवाचे आभार मानण्यासाठी ते मुक्रमाबाद येथील सभेत बोलताना ठाकरे यांनी केले.यावेळी सचिन आहिर,संपर्क आनंद जाधव,आमदार सुभाष साबणे,जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.उदगीर येथील कार्यक्रम आटपून युविसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मुक्रमाबाद शहरात आगमन होताच ढोल ताशा,लेझीम पथक,महिला डोक्यावर कळशा घेऊन सभा मंटपा पंर्यतचे शोभायात्रा काढली.
       गतवर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मा.शिवसेना पक्ष प्रमुख उव्दव ठाकरे यांनी प्रयत्न करीत आहेत असे आदित्यजी म्हणाले.पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख बालाजी पा.कबनूरकर, शिवसेना तालुका उपप्रमुख बालाजी पसरगे , मनोज जाधव, युवा सेनेचे अतुल सुनेवाड,राहुल इंदुरे,राजरत्न गुमडे,विजय शिंदे आदीने परिश्रम घेतले .