डॉ. श्री व सौ ढगे यांच्या वतीने वर्ताळा येथे मोफत दंत व स्त्रिरोग आरोग्य शिबिर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
                     500 रुग्णांना मोफत तपासणी व औषधी
           डॉक्टर झोडप्यांचा वाडी तांडयावर असाही स्त्युत्य उपक्रम

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
             शहरातील  ढगे मल्टीस्पेशालीटी क्लिनीक मधील दंतरोग व जनरल फिजीशियनचे डॉ. संदिप ढगे व त्यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ. सौ. मिरा एस ढगे या झोडप्यांनी दि. 31 जुलै 2019 रोजी वर्ताळा व वर्ताळा तांडा येथे ग्रामीण भागात मोफत दंत व स्त्रिरोग आरोग्य शिबिरआयोजन करुन 500 रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार केला. 
               मुखेड तालुका अगोगदरच दुष्काळाने होरपळत असताना अनेक गोर गरीब वंचित नागरीकांकडे दवाखाण्यात जाण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. अनेक महिलांना छोटया मोठया गोळया घेऊन घरीच उपचार घ्यावे लागते पण ढगे दाम्पत्यांनी माळरानावर असलेल्या वर्ताळा व वर्ताळा तांडा येथे स्वत: जाऊन तेथे मोफत तपासणी करुन त्यांना सर्व औषधोपवार केला. 
       या रुग्ण सेवेच्या कामामुळे त्यांचे तालुक्यातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन या कामात त्यांना श्री विठठल मेडीकल, जय मल्हार मेडीकल मुखेड व त्यांच्या सर्व सहकार्यांनी व गावातील ग्रामस्थांनी सुध्दा सहकार्य केले.