आमदार साहेब उपजिल्हा रुग्णालयास कुलुप लावाच , तुमच्या आदेशानंतरही चार वैद्यकिय अधिकारी गैरहजर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

             आमदार व उपसंचालक यांच्या आदेशाला डॉक्टराकडुन केराची टोपली
                 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाची दशा, रुग्णांचे हाल सुरुच…..
                               असून वळंबा नसून खोळंबा 

मुखेड  : ज्ञानेश्वर डोईजड
          तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या सोई सुविधा मुखेड सारख्या डोंगराळ भागात उपलब्ध व्हाव्यात या आशेने शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजुर झाले तर येथील नागरीकांना सुध्दा उपजिल्हा रुग्णालयाकडुन मोठया आशा होत्या पण आमदार डॉ. तुषार राठोड व लातुर येथील आरोग्य उपसंचालक यांनी बैठक घेऊन व अधिकाऱ्यांंच्या मनमानी कारभारास कंटाळुून आमदार महोदयाने कुलुप ठोकण्याचा ईशारा देऊन सुध्दा मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे दि. 31 रोजी नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार यांनी माहिती घेतली असता चार वैद्यकिय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसुन आले. यात डॉ. प्रसाद नुन्नेवार, डॉ. बि.एस.बिडवे, डॉ. एस व्हि तहाडे, व डॉ. लक्ष्मीकांत माने हे गैरहजर असल्याचे माहितीत समोर आले.
                 उपजिल्हा रुग्णालयातील अनेक रुग्नांना सलाईन लावत असताना स्ट्रीप्स न लावता रुग्णांना सलाईन लावत असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असताना येथील वैद्यकिय अधिकारी , कर्मचारी दिसत आहेत. डॉक्टरांचा मनमानी कारभार कमी होईल असे वाटत असता आमदार महोदयांनी मिटींग घेतल्यानंतर लगेच उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकिय अधिक्षकांनी दि. 17 जुलै ते 05 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्जित देऊन काम न करण्याचा बहाना शोधल्याचे दिसते तर मिटींग झाल्यावर लगेच अनेक डॉक्टरांनी रजा सुध्दा दिल्यामुळे त्यांना विनवनी आणल्याचे वृत्त समजले.
                   उपजिल्हा रुग्णालयात डयुटीचा चार्ट विचारला असता तो आजपर्यंत करण्यात आला नसल्याचे कार्यालयीन अधिक्षकांनी व्हि एन चटलावार यांनी सांगितले. तर डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांना याचा नाहक त्रास होत असल्याचे ही दिसुन आले. तर अनेकांनी डयुटी रजिस्टरवर सही न करता एकदाच सहया करण्याचे प्रमाणही त्यात दिसले. वरीष्ठांना नोटीसा देऊन सुध्दा डॉक्टरांच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारना होत नसल्याचे दिसुन येत आहे. 
                 रुग्णालयात 14 डॉक्टर, कंत्राटी 5 डॉक्टर, 101 कर्मचारी त्यात परिचारीका , कक्षसेवक, लॅब टॅक्नेशियन, एसीजी तंत्रज्ञ, एक्सरे तंत्रज्ञ, नेत्ररोग तज्ञ, आहार तज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, वाहक, चालक असा मोठा कर्मचारी वर्ग असताना सुध्दा रुग्णालयातील नागरीकांना सुविधा पोहचत नसल्याने अनेक नागरीकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
                 उपजिल्हा रुग्णायलात सहा ते सात वर्षापासुन सिटीस्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्नांना मोठा फटका बसत असुन यामुळे नांदेड येथे अनेक रुग्णांना जावे लागत आहे यामुळे खाजगी डॉक्टरांचे सुध्दा चांगभले होताना दिसत आहे. या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टारांना लतुर येथील उपसंचालक, आमदार महोदयांनी सांगुन सुध्दा डॉक्टारांनी आपला मनमानी कारभार चालुच ठेवला आहे. त्यामुळे खासदार प्रतापा पाटील चिखलीकर , आमदार राम पाटील रातोळीकर व आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांंनी लक्ष देऊन यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे असे जनतेतुन मागणी होत आहे. 
                वैद्यकिय अधिक्षकाच्या मनमानी कारभारामुळे व डयुटी कोणाला लावायची त्यांच्या हातात असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार चालु असुन मागील एक महिण्यापासुन महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचे केंद्र बंद झाले आहेत तर दिव्यांगाच्या प्रमाणपत्रासाठी सुध्दा अनेक दिव्यांग फेटे मारताना दिसत आहे.