नेपाळ सरकारचे डॉ.दिलीप पुंडे यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रण…..काठमांडू येथे होणार आंतरराष्ट्रीय सर्पदंश परिषद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड: प्रतिनिधी

            नेपाळ सरकार व जागतिक आरोग्य संघटना (डब्लु.एच.ओ.) यांच्या वतीने काठमांडू येथे दि.2 व 3 ऑगष्ट रोजी होणा·या आंतरराष्ट्रीय सर्पदंश परीषदेत नेपाळ सरकारने मुखेड येथील ख्यातनाम सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रित केले असून काठमांडू येथे राष्ट्रपती भवनात या परिषदेचे द्घाटन नेपाळच्या राष्ट्रपती श्रीमती बिद्यादेवी भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
          दि.2 आणि 3 ऑगष्ट रोजी काठमांडू (नेपाळ) येथे आंतरराष्ट्रीय सर्पदंश आंतरराष्ट्रीय परिषद नेपाळ सरकार व जागतीक आरोग्य संघटनेने आयोजीत केली आहे. काठमांडू येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय सर्पदंश परिषदेत राष्ट्रपती श्रीमती बिदयादेवी भंडारी यांची विशेष उपस्थिती रहाणार आहे असून यावेळी नेपाळ सरकारने डॉ.दिलीप पुंडे यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रन दिले आहे. यात डॉ.पुंडे यांचा डॉक्टरांची कार्यशाळा व चर्चासत्रात सहभाग रहाणार आहे.            नेपाळ मध्ये डोंगरी भाग, दारिद्रय, अंधश्रद्धा,आधुनिक वौद्यकीय सेवेचा अभाव यामुळे सर्पदंशाने होणारे मृत्युचे प्रमाण खुप जास्त आहे. नेपाळ सरकारने सर्पदंशाची गंभीर दखल घेत या परिषदेचे आयोजन केले आहे व जागतिक तज्ञ मार्गदर्शकाच्या सल्यानुसार सर्पदंशाने होणारे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी नेपाळ सरकारकारने हे उचललेले पाऊल आहे. नेपाळ सरकारने तज्ञ मार्गदशक म्हणून निमंत्रीत केलेले मराठवाडयाचे भूषण डॉ.पुंडे यांनी मागील 31 वर्षात मुखेड सारख्या ग्रामीण भागात सेवा देऊन 6 हजार 500 च्या वर सर्पदंश रुग्णांना जीवनदान दिले आहे व मृत्युदर 1.8 टक्यापर्यंत खाली आणला आहे.

               सामाजिक, शौक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर व रुग्ण यांच्या सोबतच सर्व स्तरांतील जनतेशी आपुलकीचे नाते जोपासणारे महाराट्रातील सुप्रशिद्ध सर्पदंश चिकित्सक, ऑक्सफर्ड विद्यापिठ लंडन येथे झालेल्या जागतीक विष परिषदेत, सर्पदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर विष परिषदेत व्याख्यान देऊन भारताचे प्रतिनिधीत्व करत, शेतकरी व शेतमजूर यांची व्यथा जागतीक पटलावर मांडणारे जांब (बु.) ता.मुखेड येथील भूमीपुत्र मुखेड भूषण डॉ. दिलीप पांडुरंगराव पुंडे यांच्या कार्याची ओळख आता सातासमुद्रापलीकडे गेली आहे. नेपाळ सरकारने डॉ.दिलीप पुंडे यांना निमंत्रि केल्याने ही बाब मुखेड व मराठवाडयासाठी भूषणावह ठरली आहे. मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.