मुखेड- कंधार विधानसभेसाठी भाजपाकडून  पाटील की  राठोड ? मतदारात संभ्रम     काँग्रेसही पर्यायी शोधात…! वंचितकडेही बड्या नेत्यांनी दिल्या मुलाखती 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
            मुखेड – कंधार विधानसभेसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली असुन यात भाजपाकडून जोरदार तयारी करीत असलेले हिंगोली येथील रामदास पाटील यांनी भाजपाकडून वरीष्ठ स्तरावर जोरदार मोर्चेबांधणी केली असल्यामुळे त्यांचे तिकीट लवकरच फिक्स होण्याची शक्यता सुत्राकडून मिळत असुन त्यांच्या तिकीटासाठी मोठी अदृश्य शक्ती तालुक्यातून व बाहेरुन सुध्दा कामाला लागल्याचे कळत आहे पण मुखेड कंधार विधानसभेसाठी पाटील की राठोड याबाबत मतदारात संभ्रम असल्याचे दिसत आहे.
             कॉग्रेसकडुन माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर व कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते  शेषेराव चव्हाण हे दोन नावे चर्चेत असुन मुख्य:त बेटमोगरेकर यांना डावलून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे नवा चेहरा मुखेड – कंधार मतदार संघाला देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असुन या माध्यमातून अशोकराव चव्हाण हे मुखेडमध्ये नवा प्रयोग करतील असे चित्र आहे. त्यामुळे ऐनवेळेस बेटमोगरेकर यांचा सुध्दा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
                 वंचीत बहुजन आघाडीकडुन अनेकांनी मुखेड – कंघार मतदार संघासाठी मुलाखती दिल्या असुन यात अनेक बडया नेत्यांचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे ऐनवेळेस वंचितकडून मोठा नेता थांबण्याची दाट शक्यता असल्याने याचा मोठा फरक तालुक्यातील राजकारणावर पडेल असे दिसते. 
               भाजपाकडून समाजभुषण रामदास पाटील यांना तिकीट मिळाल्यास विद्यमान आमदारांना मोठा धक्का मानला जाईल यामुळे तालुक्यातील राजकारणा वेगळे वळण मिळणार असल्याचेही राजकीय विश्लेषकांना वाटते. तर महाराष्ट्रात हिंगोली नपाचे काम अत्यंत उत्कृष्टरित्या केल्याबद्दल रामदास पाटील यांना नुकताच पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळाला असुन याच प्रकारे शहरातील  खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी  व नगर पालीकेला रामदास पाटील यांचा उपयोग होईल व तालुक्यातील अनेक कामे तडकाफडकी मार्गी लागतील असे अनेक नागरीकांनी आपले मत रामदास पाटील यांच्याविषयी व्यक्त केले. 
               रामदास पाटील यांची वाढती लोकप्रियता कॉग्रेससाठी धोकादायक आहेच पण विद्यमान लोकप्रतिनिधीसाठी सुध्दा धोक्याची घंटा दिसत आहे.