पदाची गरिमा वाढविणारे नेतृत्व मा.ना. पंकजाताई मुंडे

इतर लेख संपादकीय

(आज २६जुलै२०१९ रोजी मा.ना.पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)
समाजाच्या विकासासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असतात.त्यात राजकीय सत्ता असेल तर आपल्या मनातील योजनांना साकार रूप देता येते.काही व्यक्तींना पद मिळाल्याने त्यांचे महत्त्व वाढते तर असे काही व्यक्तिमत्व असतात की त्यांच्यामुळे पदाला गरिमा प्राप्त होते. असेच महाराष्ट्रातील पदाची गरिमा वाढवणारे नेतृत्व म्हणजे मा.ना. पंकजाताई मुंडे होत.
लोकनेते म्हणून ज्यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्या स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पंकजाताई ह्या जेष्ठ कन्या. मा.ना. पंकजाताई यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले.उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशात स्थिरस्थावर झालेल्या ताईंना समाजसेवेसाठी वडिलांनी राज्यात वापस आणले. वडिलांच्या हयातीत त्यांनी राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिले. सर्वसामान्यांसाठी वडील उपसत असलेले कष्ट त्या स्वतः पाहत होत्या. अशातच मुंडे साहेबांच्या प्रचाराची धुरा ही त्या सांभाळत होत्या. नंतर त्यांनी पीत्याच्या व लोकांच्या आग्रहास्तव परळी विधानसभा मतदारसंघातून २००९ ची विधानसभा निवडणुक लढवली व जिंकली.विधानसभेत आपल्या कार्याची चुणुक दाखवीली.नंतर आपल्या वडीलांच्या अचानक देहावसानाने त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. केंव्हाच भरून न निघणारे दुःख त्यांच्या वाट्याला आले.एकीकडे वडिलांचे हरवलेले छत्र व दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी काम करून वडिलांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी अचानक त्यांच्यावर येऊन पडली.अशात त्यांनी स्वतःला सावरत आता रडणार नाही लढणार असा निर्धार केला व कामाला लागल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व संघर्ष यात्रा काढुन महाराष्ट्र पिंजून काढला. हे करत असताना वडिलांवर सर्व समाजांचे असलेले प्रेम व सर्वसामान्यांच्या समस्या त्यांना जवळून अनुभवता आल्या. 2014 च्या निवडणुकीत त्या स्वतःही निवडून आल्या व त्यांच्या या संघर्ष यात्रेचा परिणाम महाराष्ट्रात भाजपाला सत्ता स्थापण्यासाठी झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना महिला बालकल्याण, ग्रामविकास व जलसंधारण खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त केले. ताईंनी मिळालेल्या खात्यांना कार्यकर्तृत्वाने देशपातळीपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. जलसंधारण खाते आपल्याकडे आल्यावर मुख्यमंत्री व सहकारी यांच्या सहाय्याने त्यांनी दुष्काळ सदृश्य महाराष्ट्रात जलयुक्त ची उत्तम कामे केली.याची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना या कार्याबद्दल सन्मानित केले. तसेच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून खेड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचाही प्रयत्न केला.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचे काम केले. सरपंच परिषदांचे आयोजन करून लोकप्रतिनिधींसी सतत संवाद साधल. जनतेतून थेट सरपंच निवडीचा नवीन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. या खात्याचीही गरिमा वाढविली व या खात्यालाही केंद्र सरकार चा पुरस्कार प्राप्त करून दिला. केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक महामार्ग महाराष्ट्रात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
महिला व बालकल्याण खात्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी अनेक निर्णय घेतले. लेक वाचवा राष्ट्र वाचवा असे जनजागृती अभियान राबविले.स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी विधानसभेत केली.एवढेच नव्हे तर मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविली. मुलींच्या वसतिगृहासाठी नीधीत दुप्पट वाढ करण्यात आली.अंगणवाडी सेवीकेंच्या मानधनात भरघोस वाढ केली.मदतनीसांनाही मानधन वाढ दिली.१८१ टोल फ्री क्रमांकावर महिलांना अडचणीत फोन करण्याची सूविधा उपलब्ध करुन दिली.स्तनपानासाठी मोठ्या शासकिय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापले.महिलाबचत गटाची चळवळ सर्वदूर पोहोचविली. या महिलांना अमेरिकेपर्यंत नेवुन बाजारपेठ उपलब्ध करुन देवुन त्यांचे मनोधैर्य वाढवीले.बचत गटांसाठी स्वतंत्र कार्यालय निर्माण केले.गटांना भरघोस नीधी उपलब्ध करून दिला.प्रत्येक जिल्हात महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ स्थापण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.महिलांना व्यावसायिक वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यासाठी आय केअर संस्थेमार्फत सामंजस्य करून आजवर अनेकांना प्रशिक्षण दिले. जी.एस.टी.तून सनेटरी नपकिनला करमुक्त केले.कुपोषीत बालकांसाठी सकस आहार योजना प्रभावीपणे राबवली.बोगस काम करणाऱ्यांवर वचक निर्माण केला.महाराष्टाच्या इतिहासात कधीच न घडलेली घटना म्हणजे शिक्षकांच्या आनलाईन बदल्या. यामुळे यातील भ्रष्टाचार बंद झाला.बीड जिल्हाचा रेल्वेचा प्रश्र्न जवळ जवळ नीकाली काढला.पीक वीमा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले.जि.प.सदस्य संख्या कमी असताना अध्यक्षपद पक्षाकडे ठेवणे,तसेच काम विधानपरिषदेत आ.सूरेश धस यांना निवडून आणने,.आ.विनायक मेटे यांचा उघड विरोध असताना लोकसभा जिंकणे,जयदत्त अण्णांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाठिंबा मिळवीणे.हे त्यांच्यातील मुत्सेदगीरी दाखवीतात.जगाच्या पाठीवर क्वचितच असे पाहयला मीळेल की सर्व सूकन्या आपल्या वडीलांचे एवढे भव्य दिव्य व समाज उपयोगी स्मारक उभारतात.त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मेळावे,दिव्यांगाना,बचत गटांना मदत करतात.पीत्याच्या जन्मोत्सवाला व पुण्यस्मरणाला १०,००० लोकांचा कार्यक्रम करतात.अतीभव्य सर्व रोग नीदान शिबीरे घेतात,मोफत शस्त्रक्रिया करुन देतात.मोठ्या प्रमाणावर साहीत्यदान,अन्नदान व ज्ञानदान देतात.

ताईंनी अनाथांना आरक्षण दिले.मराठा आरक्षणातही महत्त्वाची भूमिका पार पाडली. आपल्या भगिनी खा.डा.प्रीतम
ताईंना दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आणले.महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचारात त्यांनी अनेकांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली भगवानगडाच्या दसरा मेळाव्या संबंधाने सामंजस्याची भूमिका दाखवून बाबांच्या जन्मगावी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. भाजपाच्या युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम अशी कामगिरी पार पाडली.जिजाऊ आईसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राष्ट्र संत भगवान बाबा,म.फुले,शाहू, आंबेडकर ही त्यांची श्रध्दास्थाने आहेत.त्या संत सेवालाल महाराजांना ही मानतात.तेथील विकासासाठी तर
त्यांनी भरघोस नीधी दिला आहे.उपेक्षीत, वंचीत घटकांसी त्यांची नाळ जुळलेली आहे.ना.पंकजाताई ह्याआज सर्वसमाजाच्या नेत्या म्हणुन काम करत आहेत.खरे तर त्या भविष्यातील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आहेत.अनेकजण त्यांना या दृष्टीने पाहतात.
अश्या या कतृत्व संपन्न रणरागिणीस त्यांच्या कामापासून वीचलीत करण्यासाठी त्यांच्यावर आरोप झाले पण त्यामुळे त्या डगमगल्या नाहीत.त्या काम करतच आहेत.अफाट लोकप्रियता,अमोघ वक्तृत्व,कामात झोकुन देण्याची वृत्ती, गुणग्राहकता,अचाट स्मरणशक्ती हे व या सारखे अनेक गुण त्यांच्या ठीकानी आहेत.
त्या राज्याचा वीकास करताना बीड जिल्हा व परळी तालुक्याला विसरलेल्या नाहीत.अनेक योजना व कोट्यावधी रुपयांचा नीधी त्यांनी इथे खर्च केला आहे.त्या आपल्या वडीलांच्या आठवणी सतत जागवत असतात व सांगतात की उतरणार नाही,मातनार नाही,घेतला वसा टाकणार नाही.
शेवटी एवढीच ईश्र्वर चरणी प्रार्थना की ताईचे ऊत्तरोत्तर कार्य वाढत राहो,त्यांच्या मनातल्या कामना पुर्ण व्होवो.त्यांना दीर्घ आयू आरोग्य लाभो. हीच वाढदिवसाच्या दिवशीची मनोकामना.
प्रा.डा.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जिल्हा.नांदेड.
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५