मुदखेड शहरात मटका ,गुटखा खुलेआम चालू…संबंधित विभागाचे दुर्लक्ष

नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : रुकमाजी शिंदे

           मुदखेड शहरात संबधित विभागाच्या प्रशासन यांच्या आर्शिवादामुळे गुटखा आणि मटका अवैध विक्री खुलेआम चालू असुन स्थानिक पोलिसांनीही याकडे साफ डोळेझाक करत जणू मुकसमंती दर्शविली असल्याचे दिसून येत आहे.मुदखेड येथील रेल्वे गेट परिसरात अज्ञात गुटखा माफीयांचे मोठे गोडाऊन असून या ठिकाणांहून इतर ठिकाणी गुटखा मोठ्या प्रमाणात साठवला जाऊन इतर ठिकाणी पार्सल केला जातो.परंतु पोलिस प्रशासनाला सर्व माहिती असूनही कार्यवाही शुन्य आहे.यामुळे पोलिसांची गुटखा आणि मटका माफियांना मुकसमंती दिली असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.मुदखेड येथील रेल्वे स्टेशन परिसर,भोकर रोड चाैक,उमरी चाैक परिसर,मोंढा,रेल्वेगेट परिसर,गुजरी,नगरपरिषद परिसर,इत्यादी ठिकाणी गुटखा आणि मटक्याचे तिकिटे विक्री खुलेआम सुरु असुन संंबंधित प्रशासन साफ डोळेझाकपणा करत आहेत.

         अनेकांचे संसार उदध्वस्त करणारा मटका शहरात खुुुुलेआम चालू आहे.तर दुसरीकडे आरोग्यास घातक असल्यामुळे गुटखा विक्रीवर सरकारने मध्ये बंदी घातली आहे,परंतु मुदखेड तालुका हा तेलंगणा राज्याच्या जवळ असल्यामुळे या तालुक्यात सर्वत्र आजही खुलेआम गुटखा विकी सुरू आहे.सीमाभागात तेलंगणा राज्याच्या हद्दीत असलेले गुटखा निर्मितीचे कारखाने दररोज लाखो रुपयांचा गुटखा मुदखेडसह संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवतात.बंदीने गुटख्याचे दर वाढले,मात्र विक्रीवर कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही.अगदी शाळा महाविद्यालयांसह खेडोपाडीदेखील राजरोस गुटखा मिळत आहे.गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण लक्षणीय झाल्यामुळे सरकारने सर्वत्र गुटखा बंदी केली असताना,गुटखा तयार करणे आणि विक्री करणे या दोन्हीवर बंदी घालण्यात आली आहे.आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही केली आहे.परंतू हा निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रशासन हि बाब फारसे गांभीर्य घेताना दिसत नाही.गुटखाबंदीच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत गुटख्याची विक्री कधीच बंद झाली नाही.हि बाब तेवढीच सत्य आहे,गुटखा निर्मितीची ठिकाणे बदलली एवढाच काय तो बदल झाला.तेलंगणा राज्यातून मुदखेड मार्गे गुुटखा जिल्हाभरात पोहोचला जातो आहे.

       तेलंगणा मध्ये गुटखाबंदी नसल्याने राज्यातील गुटखा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सीमाभागात बस्तान बसवले.काही दिवसापुर्वी नांंदेड गुन्हे शाखेेने पाच लाखो रु.गुुुटखा असलेली गाडी पकडून कार्यवाही केली होती.दररोज लाखो रुपयांचा गुटखा तालुक्यासह जिल्हाभरात पोहोचवला जातो आहे ही वस्तुस्थिती आहे.गुटखाबंदीची अमलंबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी विक्रीवर करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.मुदखेडसह तालुक्यातील खेडोपाडी अनेक टपऱ्यांमध्ये गुटखा पोहचवणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे.सुरुवातीला कागदांमध्ये दडवून छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू होती.संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे.या प्रकरावर कडक कार्यवाही कार्यवाही करावी अशी होत आहे.