मुक्रमाबाद परिसरातील सध्याचे हाल, वाळू माफीया व अधिकारी मालामाल ? तर नागरिक मात्र होत आहेत कंगाल ! _________________________ होणारी रेती तस्करी थांबवण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डाँ. विपीन ईटनकर व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे साहेब लक्ष देतील का ?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुक्रमाबाद: पवन कँदरकुंठे

मुक्रमाबाद परिसरातील लेंडी व बामणी,वळंकी येथील तेरू नदीच्या नदीपात्रात अवैध वाळू उपशाने कहर केला आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला न जुमानता ही वाळू चोरी सर्रास सुरू आहे. विशेष म्हणजे, भर उन्हाळ्यातही ही चोरी महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून होत आहे.

राँयल्टी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी जनसामान्यांतुन होत आहे.

संपुर्ण देशात कोरोनाचे भय जन सामान्यांच्या मनात घर करून बसले असुन देशावरील हे संकट केव्हा दुर होणार ही एकच प्रार्थना सर्वसामान्य देवाकडे करून स्वत:ला लाँकडाऊन करून शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून डोक्यावरील सर्व टेन्शन सोबत घरातील कामे बाजुला सारून कोरोना महामारीसोबत लढतानाही दिसत आहेत.

मात्र दुसरीकडे या संधीचे सोन करून आपली दिवाळी रेती तस्कर नव्याने साजरी करताना मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद महसुलातील लेंडी, बामणी व वळंकी येथील तेरू नदीवर मात्र दिवस-रात्र नदीपात्रातुन रेती ऊपसा मात्र जोमात चालु आहे.

या वाळु चोरांच्या विरोधात पोलीसही काही करू शकत नाही,अशी स्थीती आहे. वाळुमाफीयांनी वाळु वाहतुकीसाठी समांतर रस्तेही तयार केले आहेत. तर नेहमीच्या मुक्रमाबाद,बामणी,वळंकी रस्त्यांवरही बेसूमार वाळु वाहतूक करून हे रस्तेच खराब करून टाकले आहेत. काळ्या वाळूला अंदाजे एक ब्रासला 6 ते 7 हजार रुपये घेतले जाऊन नागरीकांची आर्थिक लुट सुरू आहे. वाळू माफीयांचे मनोबल वाढविण्यामागे तलाठ्याचे हात असल्याचे जनतेतुन ऐकायला भेटत आहे. येथील पोलीस प्रशासन व महसुल विभाग यांचे पुर्णता दुर्लक्ष होताना दिसत आहेत. एकीकडे कोरोनाच्या काळात महाराष्ट्राची तिजोरी कमकुवत होत चाललेली आहे तर ईकडे मात्र शासनाचा लाखो रूपयाचा रेती तस्करांचा महसुल बुडत असतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

महसुल खात्यातील संबंधीत बडे अधिकारी गप्प का ?असा सवाल नागरींमधुन होत आहे. या अगोदर ही या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंडी व लेखी तक्रार सुद्धा केली होती मात्र या होत असलेल्या अवैध वाळू ला आळा बसलेला नाही. अधिकारी कोण्या कारणांमुळे गप्प आहेत या संदर्भात किमान या भागातील लोकप्रतिनिधींनी यांनी स्वतः होऊन लक्ष घालावे. एका बाजूला संकटात सापडलेल्या परिस्थितीत मढ्यांवरच लोणी खाणारे कोण आहेत याचा तपास घ्यावा. यासंदर्भात याठिकाणी अधिकार्यांची मिलीभगत आहे का ? जर नाही तर कार्यवाही का होत नाही,की उत्खनन विभाग व महसूल विभागाचे अधिकारी फार मोठी अर्थपूर्ण उलाढाल करत नाही ना अशी भिती व्यक्त केली जात असुन या प्रकरणात मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्काळ लक्ष घालून अशा गंभीर संकटाच्या प्रसंगी जे चालु आहे ते थांबवावे अशा प्रकारची मागणी लोकांतून होत असुन लोकांच्या मागणी पेक्षा जिल्हाधिकार्यांनी स्वतः लक्ष घालून जर ही तस्करी नाही थांबवली तर या विभागातील गिरधावार, तलाठी यांना निलंबित करावे!

 

 

 

 

नदीच्या नदीपात्रातून होणार्या वाळुचोरी संदर्भात वेळोवेळी तोंडी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. ट्रँक्टरद्वारे वाळुचोरी होत असुन, यामुळे वळंकी येथील तेरू नदीच्या पात्रालगत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे. याबाबत प्रशासनाने वाळुमाफियांवर जरब बसवावी. _________________________
किशन कँदरकुंठे, शेतकरी, वळंकी (ता.मुखेड)