मुखेडात बाजारपेठ बंद …जनसामान्यांचे हाल…. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नपाकडून  २३ हजार दंड वसूल 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
   जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर  यांच्या आदेशान्वये दि. २५ मार्च ते ०५ एप्रिल २०२१ दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनचा  आदेश दिल्यानंतर मुखेडातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली पण जनसामान्यांचे हाल होताना दिसून आले .
      मुखेड पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी बाऱ्हाळी नाका येथे सकाळपासूनच तळ ठोकून पोलीस व नपाच्या संयुक्त रित्या सैराट फिरणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडुन दुचाकी धारकाकडून २३ हजार रुपयांचा  दंड वसूल करण्यात आला.यामुळे  नागरिकांची व दुचाकी वाहनधारकांची थोडी तारांबळ उडाली.
      नागरिकांच्या व आरोग्य विभागाच्या निष्काळाजीपणाने तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले असून कोरोना रुग्ण असणाऱ्या घरातील नातेवाईक बाहेर फिरत आहेत . कुठेही प्रतिबंधित क्षेत्र दिसत नाही , कुठेही फवारणी दिसत नाही, नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रशासनाच्या वतीने कोणत्याच उपाय योजना मात्र दिसत नाही. बाहेर निघाल्यास नागरिकांकडून मात्र नपाची वसुली मोहीम जोरात मात्र दिसत होती.
   जिल्हाधिकारी यांनी मागील पाच दिवसापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी नागरिक मात्र कोरोनाचे नियम पाळताना दिसत नव्हते. यासाठी तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , वरिष्ठ पोउनि भाऊसाहेब मगरे, पोउनि कुंभारे, पोलीस नायक चंदर आंबेवार, शिवाजी आडबे , पी एन पाळेकर, बालाजी दंतापल्ले ,तलाठी बालाजी बोरसुरे, संदिप भुरे,  नपाचे शिवशंकर कुचेवाड, हरिषपाल कुमरे, सत्यजित रावळे, ईश्वर फुलवळकर आदी बंदोबस्तात होते.