मुखेड तालुक्यातील बहुतांश गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडीत  ग्रामीण भागात  नागरिकांची पाण्यासाठी भटकंती पाणी पुरवठ्याची वीज तात्काळ चालू करण्याची मागणी 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / पवन क्यादरकुंटे
गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या पाणीपुरवठ्याची वीज पुरवठा खंडीत केल्याने गावातील नागरिकांची पाण्यापासुन तारांबळ उडाली अडून खंडीत केलेला वीज पुरवठा चालू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि २२ रोजी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
     मागील  अनेक दिवसांपासून बहुतांश गावांच्या पाणीपुरवठ्याची लाईट थकीत बाकीसाठी कट करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला लाईट कट केल्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अत्यावश्यक सुविधा बंद करायच्या नाहीत,असे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी नांदेड मध्ये लाँकडाऊन करताना सांगितले आहेत. पाणी हे जीवन आहे. पाण्यावाचून माणूस हा राहु शकत नाही. लाईट आँफिसने गावच्या पाणीपुरवठ्याची लाईट कट केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी भटकंती होत आहे.
       लाईट आँफिस कडुन गावच्या पाणीपुरवठ्याची लाईट कट करण्याचा निर्णय, संपूर्ण गावातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. पाण्याशिवाय माणुस राहु शकत नाही. सामान्य माणसांच्या जिवनावश्यक पाण्याचा विचार करून  तहसिलदार साहेबांनी गावच्या पाणीपुरवठ्याची कट केलेली लाईट पुर्ववत जोडण्यासाठी आदेश द्यावेत. अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसिलदार यांच्याकडे  एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड व पत्रकार पवन कँदरकुंठे देखील यावेळेस उपस्थित होते.