शेतशिवार चालु बाकीदार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजार रूपये देण्याचे आश्वासन पुर्ण करून-नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा द्या – बालाजी पाटील ढोसणे…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

बार्‍हाळी: पवन कँदरकुंठे

महाराष्ट्र राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना महाविकास आघाडी सरकारने 2 लाख रुपया पर्यंतची कर्जमाफी देवुन थकबाकीदार शेतकर्‍यांना दिलासा दिला पण चालु बाकीदार जे नियमीत पणे कर्जाचे हफ्ते भरतात अशा शेतकर्‍यांना सरकारने शब्द दिल्याप्रमाणे प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देवुन चालु बाकीदार शेतकर्‍यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी मंञालयात मुख्यमंञी ऊध्दवजी ठाकरे व ऊपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे केली.

चालु बाकीदार शेतकर्‍यावरील अन्याय दूर झाला पाहीजे यांनाही थकबाकीदार शेतकर्‍या प्रमाणे माफी द्यावी जे शेतकरी नियमीत कर्जाचे हफ्ते भरतात अशा शेतकर्‍यात सरकार बद्दल नाराजी असुन ति नाराजी दुर तात्काळ चालु बाकीदार शेतकर्‍या बद्दल निर्णय घ्यावा अशी मागणी ढोसणे यांनी मुंबई मंञालय येथे भेट घेवुन केली. यावेळी पंढरी कांबळे,रामदास कांबळे ऊपस्थितीत होते.