कृषिपंप विज जोडणी धोरण -२०२०: शेतकऱ्यांचा   प्रमाणपत्र  देवुन सन्मान…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड -: पवन कँदरकुंठे
मुक्रमाबाद  अंतर्गत सर्व शेतकरी कृषी ग्राहकांना महावितरण कंपनीने एक योजना आणली आहे,  या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी  योजनेचा लाभ घेतला त्यांना कार्यकारी अभियंता  एस. जी. चटलावार  यांच्या हस्ते प्रमाणपत्र  देऊन सत्कार करण्यात आला.
  मुक्रमाबाद चे अभियंता एस. एम. राऊत यांनी या योजनेची माहिती देण्यासाठी ०२/०२/२०२० रोजी  कृषिपंप वीज ग्राहकांना मुक्रमाबाद येथील रुक्मिणी मंगलकार्य येथे मेळावा घेतला होता या मेळाव्यात कृषी धोरणाची माहिती दिली होती. या माध्यमातून  कृषीपंप वीज ग्राहकांनी  योजनेचा लाभ पी.सी. (३) मुक्रमाबाद सर्कल मधून २२ वीज ग्राहकांनी ४ लाख छत्तीस हजार सातशे साठ रु. भरून  या योजनेचा लाभ घेतला तर ३५८ वीज ग्राहकांनी चालू विजदेयकाचे २३ लाख रु भरून वीज मंडळाला सहकार्य केले. म्हणून   देगलूर विभागाचे कार्यकारी अभियंता  चटलावार साहेब तसेच देगलूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता  गारगोटे साहेब यांच्या हस्ते २२ वीज ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.
              उपकार्यकारी अभियंता गारगोटे यांनी कृषी ग्राहकांशी आभार मानले व महिती देताना म्हणाले, सध्यास्थ्तीत  वीज जोडणी असलेल्या ग्राहकांना सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध आहे, मागासवर्गीय कृषी पंप ग्राहकांना नवीन वीज जोडण्याकरीता प्राधान्य , योजना सुरु झाल्यापासून पाच वर्षापूर्वीच्या थकबाकीवर संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ, अशा प्रकारे सुधारित थकबाकीची रक्कम कृषी पंप ग्राहकांच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा, म्हणजेच ३१ मार्च २०२४ पर्यंत भरता येईल, ही योजना कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत  असलेल्या कृषिपंप ग्राहकांना देखील लागू राहील. या योजनेत कृषिपंप ग्राहकांकडून वसूल झालेल्या रक्मेपैकी ३३% रक्कम त्या ग्रामपंचायतमधील नवीन वीज जोडणी , पायाभूत सुविधा उभारणी व सक्षमीकरण करणे या साठी वापरण्यात येईल अशी माहिती दिली, यावेळी महावितरण चे कर्मचारी बंडगर, अडकिने, केंद्रे, इंजमाम, मठपती, ऐनुल्ला, काळे, सुळे, लक्षमन, टाकळीकर, सोलापूरे, सर्व लाईनमॅन स्टॉप उपस्थित होते .