मुखेडमध्ये ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल मिळतेय हॉटेल – टपरीवर…प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

बाराहाळी सह ईतर खेड्या गावांमध्ये पेट्रोल विक्रीचा कोणताही परवाना नसताना विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमुळे अपघात होण्याचा धोका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. …

पेट्रोल-डिझेल मिळतेय टपरीवर
पेट्रोल विक्रीचा कोणताही परवाना नसताना विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमुळे अपघात होण्याचा धोका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात पेट्रोलपंप बहुधा मुख्य रस्त्यावर व गावापासून लांब असल्याने गावातील किराणा दुकानांवरून तसेच पानटपर्यावरून वाहनधारकांना पेट्रोल विकले जात असल्याचे चित्र आहे. बाराहाळी परिसरामध्ये सध्या तर रोडच्या लगतच पेट्रोल चे कँन हातामध्ये घेऊन चक्क मोठ्या मोठ्या आवाजामध्ये १२० ला बाँटल म्हणुन दिवसा ढवळ्या पेट्रोल ची अवैधरित्या विक्री होताना दिसुन येत होते. मात्र आता पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असून यात आणखी नफा कमावण्याच्या हेतूने अवैधरीत्या विनापरवाना किराणा दुकान व पान टपऱ्यांवर उघडपणे सर्वत्र पेट्रोल विक्री होत असून चक्क १२० रुपये दराने हे पेट्रोल विकले जात आहे.

विक्री करताना बिसलरी बॉटलचे माप बनवून किंवा एखाद्या डबा बनवून लीटरसाठी ८०० ते ९०० मिली पेट्रोल दिले जात आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल विक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने पथके तैनात करून कारवाई आता सक्त करण्याची गरज आहे.