मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
प्रशासन लोकाभिमुख व्हावे व तशी ओळख निर्माण व्हावी यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून जाहूर येथे दि ०५ रोजी अधिकारी व कर्मचारी याच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला .

यावेळी माजी सरपंच नामदेव पाटील जाहूरकर यांनी ग्राम पंचायतच्या वतीने आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले . नागरिकांच्या समस्या चे निराकरण गावातच व्हावे यासाठी सर्वच विभागातील अधिकारी गावात येऊन नागरिकांना सेवा दिल्या यात पी एम किसान , निराधार योजनेच्या सेवा , आरोग्य सेवा , कृषी विभागातील सुविधा यासह इतर सेवा यावेळी देण्यात आल्या तर नागरिकांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला .
यावेळी नायब तहसीलदार महेश हांडे , डॉ मुर्कीकर , डॉ . ऐश्वर्या माने , मंडळ अधिकारी बी एल वाघमारे , डॉ . बिरादार , डॉ भाटापूरकर, डॉ ए ए डुकरे , ग्रामसेवक एस एल डुमणे , तलाठी काचावार , वनविभागाचे सोनवणे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास किरण पाटील बोडके , बालाजी पाटील सांगवीकर , देविदास पाटील बोडके , रमाकांत हिवराळे , सुधाकर सुरनर , पद्माकर मागीलवाड , विठ्ठलराव हिवराळे , प्रकाश दामेकर , माधवराव बोडके यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते