बॅटरी चोरास अटक  ; १ लाख १५ हजार रुपयांच्या बॅट­ऱ्या जप्त

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील येवती येथील बिएसएनएल टॉवरच्या बॅट­ऱ्या चोरणा­ऱ्या  चोरांस स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

तालुक्यातील येवती येथील  बिएसएनएल टॉवरच्या बॅट­ऱ्या  चोरीला गेल्या होत्या. येवती येथील स्थानिक नागरीक संजय विजयकुमार पाटील, राजु पुंडलीक फिरंगवाड, शंकर माधव मरखेले यांनी चोरी करणा­ऱ्या  आरोपीस पकडून पोलिसांकडे स्वाधीन केले.

आरोपीजवळ अंदाजे १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या २२  बॅट­ऱ्या  जप्त करण्यात आल्या असुन फिर्यादी बिएसएनएलचे अभियंता सुरेंद्र यन्नावार यांच्या तक्राीवरुन आरोपी शिवा रासुरे,माधव राउलवाड रा. किलबिलनगर मुखेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे,पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब मगरे,सपोनि संतोष केंद्रे,पोलिस अंमलदार डि एम धोंडगे,किरणकुमार वाघमारे,शिवाजी आडबे, गंगाधर चिंचोरे , भास्कर मुंडे, रमेश जोगपेठे आदी करीत आहेत.