अजयदीप कंस्ट्रक्शनचे अवैध गौन खनिज ऊत्खनन थेट विधानसभेत* *आ.रावसाहेब अंतापुरकरांनी ऊपस्थितीत केला विधानसभेत तारांकित प्रश्न* करोडो रुपयाचा शासनाचा महसुल बुडविल्याचा आरोप*

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
      मुखेड तालुक्यातील कुंद्राळा पासुन ते देगलुर तालुक्यातील वझर पर्यत सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ चे काम अजयदीप कंस्ट्रक्शन कडुन सुरु असुन या कामात अजयदीप कंस्ट्रक्शने अवैध मुरुम व दगड ऊत्खनन करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडविल्याचे प्रकरण थेट देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न म्हणून मांडले.
मुखेड तालुक्यातुन सुरु झालेला कुंद्राळा ते देगलुर तालुक्यातील वझर पर्यतचे काम अजदीप कंस्ट्रक्शन कडे असुन या कामाकरीता अजयदीप कंस्ट्रक्शनने बार्‍हाळी,वडगांव,निवळी,डोरनाळी,हंगरगा खु,खतगांव पमु,लखमापुर,सावरमाळ,सुगाव बु,कुंद्राळा,वळंकी,वंडगीर,हणेगांव,वझर,आदी गावातुंन शासनाच्या शासकीय गायरान व शासकीय पट्टेदार व वन विभागाच्या जमिनितुन कुठलीच परवानगी न घेता अजयदीपने अवैध ऊत्खनन केल्याची तक्रार अंतापुरकारांनी संबधित मंञ्याकडे व विभागीय आयुक्ताकडे पुराव्यासहीत निवेदनाद्वारे  केली होती पण अजयदीप कंस्ट्रक्शन वर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेवटी अजयदीप चा विषय राज्याच्या विधानसभेत पोहचल्याने आता याप्रकरणी जिल्हाधिकारी,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग
अधिकारी व स्थानिक अधिकारी या प्रश्नाला काय ऊत्तर देणार  हे येणार्‍या काळातच कळेल पण शांत स्वाभावाने परीचित असलेले मनमिळावु आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या आक्रमक पणाने महसुल यंञणा हादरली असुन अजयदीपला पाठीशी घालणार्‍यात चिंतेचे वातावरण दिसुन येत असल्याची चर्चा ऐकवण्यास मिळत आहे.
     अजयदीप संबधी बर्‍याच सामजीक कार्यर्त्याची व विविध संघटनाची तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे होती पण कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने सामजीक कार्यकर्त्यानी आमदार अंतापुरकरांनी ऊपस्थितीत केलेल्या प्रश्नावर आनंद व्यक्त करत होते.