नपा कर्मचा­ऱ्यांचे १ मार्चचे आंदोलन स्थगित ;            १५ एप्रिल पासून बेमुदत संप राहील – जिल्हाध्यक्ष शेंडगे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
             मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दि. १ मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार होते पण कोरोनाची साथ पाहता  राज्य संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे,सरचिटणीस रामेश्वर वाघमारे यांच्या पत्रावरून  हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले पण दि  १५ एप्रिल पासूनचा बेमुदत संप राहील असे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम शेंडगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.

नपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे नेहमी दुर्लक्ष झाले असुन वेळोवेळी प्रश्न सरकार दरबारी मांडूनही कर्मचा­ऱ्यांचे प्रश्न जैसे थे वैसेच राहत आहे. यामुळे १ मार्च रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार होते पण कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता या आंदोलनामुळे कोरोना राज्यात पसरु नये व राज्य सरकारला व जनतेला याचा त्रास होऊ नये यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलन स्थगित झाले असले तरी दि. १५ एप्रिल पासून बेमुदत संप राहील आमच्या मागण्या व हक्कासाठी यापुढेही सरकारशी लढत राहु. सरकारने मागण्या मान्य नाही केल्यास यापेक्षाही  उग्र आंदोलन करु असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष बलभिम शेंडगे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष लालू  सोनकांबळे, बाबुराव  केंद्रे, जिल्हा  सचिव जितेंद्र  ठेवरे आदी उपस्थित  होते .


या आहेत मागण्या……….

कर्मचाऱ्यांचा पगार दोन तीन महिण्यांनी न करता दरमहा करावा,रोजंदारी कर्मचा­ऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते देण्यात यावे,कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कर्मचा­यास ५० लक्ष रुपयांचा विमा कवच देऊन वारसांना अनुकंपावर नोकरी देण्यात यावी, राज्यसेवा संवर्गातील कर्मचारी यांचे डीसीपीएस / एनपीएस खाते सुरू करून तात्काळ वर्गणी जमा करण्यात यावी, तसेच संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती कॉन्ट्रीब्युशन रजा रोखीकरण रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, मुख्याधिकारी संवर्ग परीक्षा तात्काळ घेण्यात यावी तसेच त्यांच्या रजा कालावधी मध्ये राज्य सेवा संवर्ग मधील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा विविध मागण्या यात करण्यात आलेल्या आहेत.

Attachments area