ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे हिंदी विषयाच्या एक दिवसीय ई-राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड – वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील ग्रामीण( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालयाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी दु.१२.०० वाजता ‘हिंदी संत साहित्य की प्रासंगिकता’ या विषयावर एक दिवसीय ई-राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हिंदी विभागाकडून करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड राहणार आहेत तर या परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन हे करणार आहेत.या परिषदेत बीजभाषण धारुर जि.बीड येथिल माजी प्राचार्य डॉ. महेंद्र ठाकुरदास हे देणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ अर्जुन चव्हाण व जयपूर येथील आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक डॉ कृष्ण बीर सिंग हे ‘हिंदी संत साहित्याची प्रासंगिकता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.ही राष्ट्रीय परिषद झुमच्या माध्यमातून घेतली जाणार.याची नोंदणी लिंक, मिटींग लिंक व आय.डी.साठी आपण ९४२३४३७२१५ या क्रमांकासी संपर्क साधुन माहिती घेवु शकता.

तेंव्हा या राष्ट्रीय परिषदेचा जास्तीत जास्त हिंदी विषयाच्या शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तसेच अन्य साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख तथा हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण, सहसंयोजक प्रा.डॉ. रामकृष्ण बदने,प्रा. डॉ. व्यंकट चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.