तीर्थक्षेत्र मोळेश्वर येथे ऊर्जा फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती ऊत्साहात साजरी

इतर बातम्या ठळक घडामोडी महाराष्ट्र
तीर्थक्षेत्र मोळेश्वर ता. जावली जि.सातारा येथे #ऊर्जा_फाऊंडेशन च्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी अतिशय ऊत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमास श्री. राजेंद्र पोळ(तहसिलदार-जावली), श्री रमेश देशमुख(तालुका कृषी अधिकारी), श्री सतिश बुद्धे(गटविकास अधिकारी) व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने कोरोना काळात विशेष कामगिरी केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर शिव छत्रपती व जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर आधारीत पुस्तके देण्यात आली.
ज्या शिव छत्रपतींनी आपल्या रयतेसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्यांचा वारसा सांभाळणे हे आपले काम आहे. आपण सर्वजण देशप्रेमी आहोत तेव्हा देशसेवा करायची असेल तर सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळले पाहीजे. विषमुक्त शेती ही संकल्पना राबवून जीवामृत व नैसर्गिक संसाधने यांचा वापर करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. या अभियानाची सुरुवात मोळेश्वर येथे करण्यात आली आहे. गटशेतीला जास्तीत जास्त प्राधान्य मिळावे असे ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) यांनी सांगितले.