महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाकडून राष्ट्रसंत , स्वच्छता दूत गाडगेबाबा यांची 143 वीं जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयात स्वच्छतेचे संदेश देऊन परिसर स्वच्छ ठेऊन प्रत्येकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा मनोदय प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सी.बी.साखरे , प्रा.डॉ.एम.के. राऊत , प्रा.डॉ. डी.के.आहेर , अधिक्षक एस.के.सूर्यवंशी हे होते. मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा.डी.बी.साखरे , प्रा.डॉ. बी.टी.पाटील , प्रा.डॉ. पी.डी.राठोड , प्रा.डॉ. बी.व्ही. चिल्लरगे , प्रा.डॉ. ए.एन.गित्ते , प्रा.डॉ. सी.एन.एकलारे , प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर , प्रा.डी.पी.ए.जोशी , प्रा.डॉ. के.बी.हातोडे , प्रा.डॉ. व्ही.जी.वारकड , प्रा.डॉ. बी.एस.केंद्रे , प्रा.डॉ. एस.एच.टाले , ग्रंथपाल ए.बी.गजमल , प्रा.जी.एम.वायपणकर , प्रा.बी.पावडे , प्रा.एस.बी.बळवंते , प्रा.एस.पी.अग्रवाल , प्रा.जी.ए.गाडले , प्रा.एस.व्ही.तमशेट्टे , प्रा.डॉ. एस.बी.गायकवाड , प्रा.ओ.व्ही.राजारूपे , प्रा.एस.एम.कामोले, प्रा.एम.सी.साखरे , प्रा.आर.सोनुले , इत्यादी वरिष्ठ ,कनिष्ठ व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.