सक्तीने वसुली करताणा बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या हत्येला महावितरणला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा: शिवशंकर पाटील कलंबरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड: पवन कँदरकुंठे

महावितरणाने शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकर्यांवर अन्याय झाल्याची भावना शेतकरी बोलवुन दाखवत आहेत. आधीच करोना का कहर त्यात महावितरणने केली शेतीपंपाची विज गुल असेच म्हणण्याची वेळ ही सध्या तरी आलेली दिसतेय.

सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या शेतीच्या लाईटबिलाची वसुली करताणा, शेतकऱ्यांसोबत अत्यंत सक्तीने वसुली केली जात आहे. शेतात पाण्याला आलेले ऊभे पीक पाण्याअभावी वाळत असताना त्यांची लाईट कट केली जात आहे. एका शेतकऱ्याने त्याचे स्वताचे लाईटबील भरायला तयार असताना,त्यांना त्यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांची वसुली करून दिल्याशिवाय लाईट जोडुन दिली जात नाही. शेतकऱ्यांना लाईटबिलाच्या वसुलीसंबद्धी नोटीस न देताच त्यांच्या शेतात जाऊन लाईट कट केली जात आहे. लाईट कट केल्यामुळे पाण्याअभावी पिक वाळण्याच्या भितीने शेतकरी आत्महत्या सारख्या टोकाच्या भुमिकेकडे वळत आहेत. यासाठी सक्तीने वसुली करत असलेले कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

शेतीच्या लाईटबिलाची वसुली करताणा शेतकऱ्यांसोबत सक्ती न करता सहकार्याने वसुली करणे व शेतकऱ्यांना रितसर नोटीस देऊन लाईट कट करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत. अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी आज उपविभागीय अधिकारी साहेब देगलुर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे लेखी मागणी केली आहे.