मुक्रमाबाद परिसरात वाळू माफियांचा हैदोस, राजकीय मंडळींचा अप्रत्यक्षपणे सहभाग, प्रशासन मात्र ढिम्म…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड: पवन कँदरकुंठे
मुखेड तालुक्यातील बामणी येथील तेरू नदीच्या पात्रात,तर मुक्रमाबाद येथील लेंडी नदी पात्रात रेती माफियानी हैदोस माजवलाय.
बामणी ते मुक्रमाबाद या रस्त्यावर रेतीने भरलेल्या अवजड अशा वाहतुकीच्या वर्दळीमुळे येथील रस्ता हा ‘मौत का कुवाँ’ बनला आहे. बिनधास्त पणे वाळुने भरलेले ट्रँक्टर सुद्धा याच रस्त्यावर ऊभे करून वाळु धुतली जात आहे, त्यामुळे येथील रस्ता हा पुर्णतः खड्यात गेला आहे.
                     कित्येक वर्षे नि वर्षे येथील नदीच्या नदी पात्रातुन वाळु ऊपसा होतोय मात्र थातुर मातुर कारवाई करून येथील प्रशासन त्या वाळु माफीयांना नंतर ढिल देतात. त्यामूळे रोज असंख्य अशे ट्रँक्टर वाळु ऊपसा करताना रोज नदीच्या नदीपात्रात दिसुन येतात.
         याबाबत लोकभारत न्युजने वेळोवेळी व्रत्त प्रसीद्ध करून देखील या रेती माफीयांचे एक नाही अनेक असे विषय प्रशासनाचे समोर आणुन दिले परंतु येथील प्रशासनाकडुन कार्यवाही मात्र काहीच होताना दिसत नाही.
सगळे नियम पायदळी तुडवत तेरू व लेंडी नदीपात्रात रेती माफियानी पोखरण्यास सुरुवात केलीय. बड्या राजकीय मंडळींचा या रेतीमाफियात अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये. प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याने रेतीमाफियां जास्तच सुसाट झाल्याचे चित्र दिसतंय. सर्व नियम धब्यावर बसवत इथे रेती उपसा सुसाट सुरु आहे.
शिवाय जे सी बी ने उपसा करण्याची परवानागी नसताना अनेक जेसीबी ने रेती उपसा हा केला जातोय.  हा सर्व प्रकार हा येथील महसुल प्रशासनाला तसेच पोलिस प्रशासनाला माहिती असुन देखील ते मुद्दाम “तू कर रडल्यासारखे, मी करतो मारल्यासारखा” या म्हणी प्रमाणे काही पैस्यांच्या लालसेपोटी मोहात पडुन रेती तस्करांना येथील प्रशासन मुद्दाम पाठिशी घालतायेत. हे जनतेला आता चांगलेच माहित झाले आहे. म्हणुणच येथील रेतीचे निवेदा निकाली काढल्या जात नाही.
सर्रास हा प्रकार सुरु असतांना प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नाहीये. दररोज हजारो अशा रुपयांची रेती नदीपात्रातून काढल्या जात असून सर्वांच्या आशीर्वादाने हा रेती उपसा सुरू असल्याचे येथील नागरीकांतुन सांगितल्या जातेय.
रेती माफियांच्या या हैदोसामुळे मुखेड तालुक्यातील बामणी व मुक्रमाबाद या गावातील ग्रामस्थांच जगणं मुश्किल बनलंय. रात्रंदिवस जेसीबीच्या व ट्रँक्टर च्या आवाजाने इथले ग्रामस्थ झोपू देखील शकत नाहीयेत. त्यातुन गावकऱ्यांनी तक्रार करूनही मुखेडातील महसुल प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करतायत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे अशी मागणी जनसामान्यांतुन होतेय.