होनवडज ग्राम पंचायातच्या सरपंचपदी जनाबाई तलवारे         तर उपसरपंचपदी पार्वतीबाई सुरनर यांची निवड

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : मुखेड तालुक्यातील होनवडज ग्राम पंचायते नृसिंह एकता ग्राम विकास पॅनलच्या सरपंच पदी जनाबाई तलवारे तर उपसरपंचपदी पार्वतीबाई सुरनर यांची निवड दि. १२ रोजी करण्यात आली.

ही निवड अध्यासी अधिकारी कैलास येमलवाड यांच्या उपस्थितीत गुप्त मतदान घेण्यात आले. यात 13 ग्राम पंचायत सदस्यापैकी जनाबाई तुळशिराम तलवारे यांना ९ मतदान सरपंच पदासाठी मिळाले तर मिनाक्षी प्रदिप कांंबळे यांना ४ मतदान मिळाले. तर उपसरपंच पदासाठी पार्वतीबाई ज्ञानोबा सुरनर यांना १३ पैकी ९ गुप्त मतदान मिळाले तर संभाजी शंकर जाधव ४ मतदान मिळाले.

यावेळी नागनाथ पा जाधव, पांडुरंग पा जाधव, पोलिस पाटील शंकर जाधव ,  गणपत चव्हाण , ज्ञानोबा सुरनर, नागोराव पाटील, बालाजी देवराव पाटील, शिवाजी पाटील, विठइल पाटील, संतोष पाटल, कबिरदास कांबळे, कुणाल कांबळे, काशिनाथ गुरुजी , आनंद बोनलेवाड, प्रकाश गुजलवार, अमोल पाटील, सचिन शंकरराव पाटील, व्यंकट मारकवाड, आनंद बामणे, माधव खतगांव, अच्च्युत पाटील, व्यंकट भुताळे, एन टी कांबळे, बाबुराव कांबळे, आत्माराम तलवारे यांच्यासह गावातील नागरीक ,महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Dnyaneshwar Computers

Dr. Babaseb Ambedkar Smarak Near
Choudhari Complex , Mukhed