उमरदरी ग्रामपंचायत सरपंच पदी कल्पनाताई दशरथ कांबळे व उपसरपंच पदी पार्वती बालाजी चाफेकर यांची बिनविरोध निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : उमरदरी ग्रामपंचायत सरपंच पदी कल्पनाताई दशरथ कांबळे व उपसरपंच पदी पार्वती बालाजी चाफेकर यांची बिनविरोध निवड करण्यात  आली .

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुखेड तालुका अध्यक्ष तथा उमरदरी ग्रामविकास पँनल प्रमुख शिवाजी नागोराव जाधव याच्या मार्गदर्शना खाली सरपंच व उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर करून उमरदरी ग्रामपंचायत सरपंच पदी कांबळे कल्पनाताई दशरथ व उपसरपंच पदी चाफेकर पर्वती बालाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते