पिकविमा सरसकट दया, अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबवा, चालु कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा   – कलंबरकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा सरसकट मंजूर करावा,  अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबवा तसेच चालु कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा मागण्यांचे निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी थेट मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दि. ११ रोजी मागणी केली.

थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे पण अनेक शेतकरी नित्यनियमाने आपले कर्ज भरत असतात अशा कर्जदारांची कर्ज माफी होणे गरजेचे आहे अन्यथा कर्ज न भरण्याची संख्खा वाढत राहणार.

विमा कंपनीकडून विमा मंजुर करीत असताना शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे तालुक्यात ढगफुटी,भुस्सखलन,गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतीवाहुन गेली मंत्री आले पाहुन गेले पण तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा  मिळाला  नाही.

याबाबत सरकारने शेतकऱ्यांना न्याय देऊन विमा कंपनीवर कार्यवाही करावी व तालुक्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना अनावश्यक कागदपत्रे मागत असुन शेतकऱ्यांची अनावश्यक कागदपत्र मागणीपासुन सुटका करावी अशा विविध मागण्या शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.


शेतकऱ्यांच्या या मागण्या रास्त असुन याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असल्याची माहिती शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिली.


शेतकऱ्यांच्या या मागण्याबाबत तहसिल व जिल्हा स्तरावर अनेकवेळा मागणी करण्यात आली पण याबाबत सथानिक प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नाहीत.