लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या – सतिष धनवाडे यांची मागणी मानवहित लोकशाहीच्या पक्षाचे मुखेडात धरणे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  जगडमवार 

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतिने दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पांसुन सतिष धनवाडे यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालया एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यह आझादी झुठ्ठी है, देश की जनता भुकी है चे जोरदार घोषणा देत हे धरणे आंदोलन चालू होते.

यात प्रमुख मागणी होती. की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ चालु करुन महामंडळ बचाव समिती स्थापन करण्यात यावी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे,१ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी शासकीय सुटटी जाहिर करावी,क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करावे,क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक संगमवाडी पुणे. येथे उभारण्यात यावे,अ,ब, क,ड, नुसार वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे,बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापन करावी,भूमिहीन लोकांना गायरान जमीन गायरान धारकाच्या नावे करावे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आले.

त्याच बरोबर दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी राजाच्या आंदोलनाला जाहिर पाठींबा देण्यात आले.यावेळी स्वाभिमानी संभाजी बिग्रेड तालुका अध्यक्ष हर्षवर्धंन पा.बेळीकर,व छावा संघटनेचे ता.अ.विनायक पा.माहेगावकर यांनी पाठीबा दिले होते.या धरणे आंदोलनाचे नेतृत्व मानवहित लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.सतिष धनवाडे,जिल्हा उपाध्यक्ष मारोती भालेराव,राधाबाई जाभळे,स्वपनिल वाडेकर,अर्चना वाडेकर,गजानन गायकवाड,वैभव मोरे,संजय गायकवाड, संदिप मळगे,सुखानंद गायकवाड, बळीराम काबळे अदिच्या निवेदनावर स्वाक्षय्रा होत्या.