खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेडात रक्तादान शिबिर         शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांचा  उपक्रम 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

हिगोली जिल्ह्यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील लोखंडे चौकात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयासमोर भव्य रक्तादान शिबिरांचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंञी तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे. असे आव्हान केले होते.यासाठी शिवसेनेच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांनी केले.

       या आव्हानाला मोठा प्रतिसाद देत एका तासाच्या आत पन्नासच्या वर युवकांनी रक्तदान केले. मुखेड तालुक्यातील युवक व शिवसेनेचे पपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार हेंमत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या रक्तादान शिबिरात पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.    या रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करून ते शासकीय रूग्णालयाला देण्यात येणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांनी सांगितले.
………………….. ………..
यावेळी आमदार डाॅ तुषार राठोड, यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे ,उपजिल्हाप्रमुख संजय बेळीकर , उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक,शंकर पा.लुट्टे,तालुका प्रमुख बालाजी पा.कबनुरकर ,उपतालुकाप्रमुख गंगाधर  पिटलेवाड, वसंत संबुटवाड,जिल्हा संघटक व्यंकटराव लोहबंदे ,शंकर पोतदार,शरद कोडगिरे,शिवा मुद्देवाड,जेष्ट पत्रकार सुशिल पत्की,पत्रकार पवन जगडमवार ,विजय कौत्तापल्ले,शंकर चितंमवाड,दयानंद यरपुलवाड, राजु गुड्डेमवार,विश्वनाथ लोखंडे,संतोष घायेवार,उद्धव नागरवार यांच्या सह शिवसेनेचे असंख्ये कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.