३८५ कंपन्या मधील ६५,६७५ जागांसाठी भरती- भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा. न भूतो न भविष्यती ! रोजगाराची सुवर्ण संधी.!! भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन भव्य रोजगार मेळावा!!!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र

 

३८५ कंपन्या मधील ६५,६७५ जागांसाठी भरती
वरील संख्येत दररोज पदे व कंपनी मध्ये वाढ त्यासाठी दररोज भेट द्या व ॲप्लाय करा- www.rojgar.mahaswayam.gov.in

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन
नोकरीइच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची पर्वणी

राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन करणे अनिवार्य झाले होते. त्याचा विपरीत परिणाम उद्योग / व्यवसाय यांच्यावर झाला होता. परंतू, आता राज्यातील सदर उद्योग / व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत किंबहुना काही उद्योग पुन्हा सुरु झालेही आहेत. त्यामुळे रोजगाराच्या पुन:श्च विविध संधी तसेच, विशेषत: कोविडच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

या बाबींचा सर्वंकष विचार करुन मा. ना. श्री. नवाब मलिक साहेब, मंत्री महोदय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य, यांच्या निर्देशांनुसार दि. 12 व 13 डिसेंबर, 2020 या दोन दिवसांच्या कालावधीत एका “राज्यस्तरीय महारोजगार मेळाच्याचे” आयोजन, राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात या नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सदर रोजगार मेळाव्याचा इव्हेंट क्रिएट करण्यात आला आहे.

नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यामध्ये पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग / व्यवसाय यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे ​९ वी पास पासून पुढे ​​किंवा ​१​० वी व १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी या कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रातील रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

दररोज विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत आहेत.आतापर्यंत पुढील नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हीसेस, महिंद्रा स्टील सर्व्हीस सेंटर, एल जी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लि., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ), मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्शन सोल्युशन प्रा. लि., ॲडविक हाय-टेक, युकेबी इलेक्ट्रॉनिक्स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रूमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स इ. सारख्या नामांकित कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदविलेली आहेत.

सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम आपला विभाग व नंतर आपला जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस , दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

तरी इच्छुक युवक युवतींनी दिनांक : 13 डिसेंबर, 2020 पर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महा पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा,