दिव्यांग वृध्द निराधार यांचा दिग्रस ता. कंधार येथे मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

कंधार ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

कंधार –  दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला
प्रथम पांडुरंग रुक्मिणी ची पुजा पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रस्ताविक भाषण केंद्रे यांनी मिटिंग घेण्याचा उद्देश स्पष्ट करताना दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना मिळणाऱ्या अनेक योजनेची माहिती मिळावी म्हणून मा डाकोरे पाटिल हे सतत प्रयत्न करीत असल्यामुळे आपल्या भागातील सर्वाना माहिती मिळावी म्हणून मेळावा घेण्यात आला सर्वानी डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावे असे आव्हान केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर यांनी दिव्यांग बांधवांसाठी बिजभांडवल योजनेचे कर्ज देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले
मुखेड चा ऊपअध्यक्ष यादवराव फुलारी यांनी दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठीम मा डाकोरे पाटिल नांदेडजिल्ह्यातील गाव पातळीवर जाऊन सर्व दिव्यांग बाधवाना संघटितपणे संघर्ष केल्यामुळे गावपातळीवर दिव्यांग बांधवांना न्याय मिळाला आहे अनेक योजना अंमलात आणण्यासाठी सर्वानी संघटित होण्याचे आव्हान केले.

अध्यक्षिय भाषणात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बांधवांनी दिव्यांग मिञ अँप मध्ये आपली नोंदणी ग्रामसेवक यांच्या कडुन करुन घ्यावी नोंदणी झाल्याशिवाय आपल्यास शासन स्तरावरून मिळणार्‍या सवलती मिळत नाहीत व दिव्यांग बांधवांना चाळीस सवलती असुन आपण जागे झाल्याशिवाय आपणास सवलती मिळत नाहीत त्यासाठी सर्वानी संघटित पणे संघर्ष करून आपला हक्क घेण्याचे आवाहन केले
या कार्यक्रमात जी प. सर्कलचे दिव्यांग बांधव उपस्थित होते शिवाजी हेंडगे, केंद्रे सर शिवाजी वडजे, नारायण सुर्यवंशी, फुलुबाई आगलावे, शंकर वडजे, मुसळे. राठोड, आगलावे राठोड ई शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सुञसंचलन व आभार मंगनाळे सरांनी मांडले सर्वाना जेवनाची व्यवस्था केंद्रे सरांनी केली,
असे प्रसिद्ध देण्यात आली