माहिती अधिकाराची सुनावणी ठेऊन सामाजिक वनिकरण अधिकारी सोनवणे यांनी अर्जदारास माहिती दिलीच नाही

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील सकनुर येथे वृक्षलागवडीबाबत अर्जदाराने दि. १९ आक्टोबर २०२० रोजी माहिती मागवली असता सामाजिक वनिकरण अधिकारी निलेश सोनवणे यांनी दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी अर्जदारास व्यक्तीश: यावे असे पत्र दिले पण दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी अर्जदारास माहिती दिलीच नसल्याचे अर्जदार रमेश राठोड यांनी दैनिक गाववालाशी बोलताना म्हणाले.

सकनुर येथे सन २०१५ ते २०२० या कालावधीत किती वृक्ष लागवड केली व किती निधी आलेला आहे याचा तपशिल अर्जदार रमेश राठोड यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागितली असता सामाजिक वनिकरण अधिकारी निलेश सोनवणे यांनी दि. ०४ नोव्हेंबर २०२० रोजी अर्जदारास पत्र देऊन दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता उपस्थित रहावे व अर्ज निकाली काढू असे अर्जदारास सांगितले.

अर्जदार रमेश राठोड सकाळी ११.३० वाजता कार्यालयात गेले पण अधिका­ऱ्यांनी माहिती न देताच पुढील ३ किंवा ४ डिसेंबर रोजी येण्याचे तोंडी कळविल्याचे अर्जदारांनी सांगितले. यामुळे मुखेड तालुक्यात माहिती अधिकारास अधिकारी केराची टोपली दाखवित असल्याचे समोर आले आहे.


याबाबत सामाजिक वनिकरण अधिकारी निलेश सोनवणे यांना मोबाईलव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन न उचल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया कळली नाही.


मुखेड तालुक्यात सामाजिक वनिकरण विभाग अंतर्गंत मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली असुन याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी कर