पदवीधरांच्या हक्कासाठी लढतोय….. साथ दया – सिध्देश्वर  मुंडे           मुखेडात पत्रकार परिषदेत मुंडे यांचे प्रतिपादन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मराठवाडा पदवीधर निवडणूक ही पक्षविरहीत असते त्यामुळे ही निवडणूक चिन्हावर नाही तर क्रमांकावर लढली जाते पदवीधरची निवडणूक अनेक उमेदवार पक्षासाठी लढत आहेत तर मी पदवीधरांच्या हक्कासाठी लढतोय त्यामुळे पदवीधरांनी मला साथ दयावी असे मराठावाडा पदवीधर निवडूणकीचे उमेदवार  सिध्देश्वर  मुंडे मुखेडात पत्रकार परिषदेत दि. २७ रोजी बोलताना म्हणाले.

मागील अनेक वर्षापासुन पदवीधरांना ग्राहय धरले जाते . पदवीधरांच्या मागण्याबद्दल कोणीही विचार केला नाही. निवडणूक आली की यायचे अन संपली की गायब व्हायचे असा प्रकार पदवीधर निवडणूकीत होत आहे असे ही मुंडे म्हणाले.

सिध्देश्वर  मुंडे मुखेडात येताच  डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन केले तर ग्राम पंचायत संगणक चालकाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सिध्देश्वर मुंडे हे असल्याने तालुक्यातील ग्राम पंचायतचे संगणक चालक व पदवीधर मतदारही मोठया प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

यावेळी त्यांच्यासोबत अविनाश  भोसीकर , संग्राम डिकळे , बोईनवाड मामा , गणेश आडे, कल्याण श्रीरामे, पवन शिरबरतळ , राजू  आडगुलवाड , शंकर वानळे , दत्तात्रय अटकळे , चक्रधर कारळे, ज्ञानेश्वर  कुंडगीर , संदीप  गवते,प्रकाश गायकवाड, बालाजी  ईबीतदार , बालाजी  बिरादार , मारोती  सादगीर यांच्यासह अनेकजण उपस्थित  होते .


पदवीधरासाठी महामंडळ उभे  करणे , बेरोजगारांना १५ हजार  भत्ता देणे , ५ ते ५० लाख रुपये  पर्यंत  कर्ज देऊन ४० अनुदानासाठी शासनाचे  लक्ष  वेधणार , विना अनुदानित शाळेच्या  शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान  देणे , महा इ सेवा  केंद्र चालकाचे व आपले सरकार व सीएससी  चालकांचे  असे विविध प्रश्न मांडणार  असल्याचे यावेळी  सिद्धेश्वर मुंडे म्हणाले .