मुदखेड येथील कालेजी मंदिर देवस्थानच्या नवरात्रातील सर्व कार्यक्रम रद्द !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

 

नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी
——————————————
मुदखेड येथील कालेजी मंदिर देवस्थानच्या वतीने नवरात्रातील सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

मुदखेड शहरात दरवर्षी नवरात्र महोत्सवात जागृत देवस्थान असलेले कालेजी देवस्थान माहुरच्या रेणुकामाताचे उपपीठ म्हणुन मराठवाडा व तेलंगाणात प्रसिध्द आहे,उप पीठाची स्थापना करणार्‍या कालेजी महाराजांना रेणुकामातेने दृष्टांत देऊन येथे स्थापना करायला सांगितल्यामुळे मुदखेडला येऊन दाट झाडी असणार्‍या चिंचेच्या बनाच्या जागेची मागणी जमीनमालक शिवरामपंत चौधरी यांचेकडे केली , ती मान्य झाली व रेणुकामाता मुदखेडमधे स्थानापन्न झाली.असे परिसरातील भाविक सांगतात.
अश्विनशुध्द प्रतिपदेपासुन विजयादशमीपर्यंत सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबर गोंधळ,जोगवा,आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन होते हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात सर्व कार्यक्रम साजरे होतात.परंतू यावर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिर कमेटीच्या एक बैठक घेऊन या बैठकीत शासनाच्या निर्देशाप्रमाणे मंदिर बंद राहणार असल्याचा निर्णय घेत,यावर्षी नवरात्र उत्सव हा प्रातिनिधीक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले आहे.तरी परिसरातील सर्व भाविकांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती देवस्थानच्या वतीने अध्यक्ष नारायण कोत्तावार, मुकुंद चौधरी , गणपत कदम, शशिकर चौधरी ,श्रध्दानंद चौधरी ,जयराम तुप्तेवार ,राम सोनी, श्रीराम काचावार ,गोविंद चौधरी ,देवस्थान पुजारी मारोती महाराज आदिसह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.