नेटवर्क मिळेना अन् फोन लागेना..! रेंजही गुल; आँनलाईन शिक्षणासह ईतर व्यवहारही ठप्प..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड: पवन कँदरकुंठे

मुखेड तालुक्यातील आयडिया ओडाफोन जीओ या कंपनीचे मोबाईल टाॅवर नेटवर्क वेळेवर मीळत नसल्याने ग्राहकांना नेटवर्क मीळत नसल्याने सर्व कामकाजाचा बोजवारा उडाला असल्याने खोळंबा झाला आहे.

तालुक्यातील शान वाढवणारे मोबाईल टॉवर हे सध्या कुचकामी ठरत असून, मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊनही नाहक त्रास सहन करण्याची वेळ मोबाईल ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहक वर्ग मात्र संताप व्यक्त करीत आहे.

मोबाईल हि अत्यावश्यक सेवा मध्ये गणल्या जात असून बहुतांशी व्यवहार मोबाईल द्वारे होत आहेत.
कोरणा या माहामारिच्या संसर्गजन्य आजारामुळे शाळा कॉलेज बंद आहेत. तरी शिक्षण प्रणाली हि ऑनलाईन मोबाईल द्वारे सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यासाठी इंटरनेट मोबाईल सेवा अत्यंत गरजेची झाली असल्याने ग्रामीण खेड्यात गाववाडी तांड्यावर शेतकर्याची परिस्थिती नसताना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन क्लास अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहे. व तसेच सद्यस्थितीला सुरू असलेल्या *बि.ए.त्रतीय वर्षाच्या अंतीम परिक्षा ह्या सुद्धा आँनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे.*

कॉल ड्रॉप, कॉल डिस्कनेक्ट, मंदावलेल्या नेटवर्कमुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. आयडिया ओडाफोन जीओ नेटवर्क कंपनी 4 जी नेटवर्क च्या नावाखाली 2 जी सेवा देत आहे. परिणामी विद्यार्थी व पालक वर्गाच्या हिरमोड होत आहे.

तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग असून या भागातील सर्व शेतीवर आधारित आहे. मागील महिन्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीच्या पिकाची अतोनात नुकसान झाले आहे. नदी व तलावाजवळील शेजारील पिके आपल्या कवेत घेऊन वाहत असल्यामुळे नदी शेजारील शेतकऱ्यांचे पीक गेले आहे.

काढणीपूर्व पिक शेतकऱ्यांच्या हातचे गेल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. प्रधानमंत्री पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीचे 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन मोबाईल द्वारे पिकाचा अर्ज भरा म्हणतात आणि मुखेड तालुक्यात सद्यस्थितीमध्ये नेटवर्क सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावावरून शहराच्या ठिकाणी जाऊन आपले अर्ज भरावे लागत आहे.

फोर जी चे रिचार्ज आणि टूजी सेवा देत आहे. एका महिन्याचे रिचार्ज दोनशे रुपये तरीपण ग्राहकांना 4 जी सेवा देत नाही. जिओ सुविधा उत्तम असल्याचे कंपनी सांगून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपले नेटवर्कचे जाळे वाढवले आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची त्यांनी सांगितले. पण मागील नेटवर्क विषयी विचारणा केली असता नेटवर्क सुरू करू असे आश्वासन कर्मचारी देत आहेत.

आयडिया वोडाफोन जीओ कंपनीने नेटवर्क अडचण दूर करून परिसरातील सेवा सुरळीत करून देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी फोन द्वारे संपर्क साधुन नेटवर्क ची सेवा सुरळीत करावी अशी मागणी मोबाईल धारकातुन केली जात आहे.