श्रीमती सुमित्राबाई आगलावे यांचे निधन  जेष्ठ पत्रकार दादाराव आगलावे यांना मातृशोक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड :  तालुक्यातील वर्ताळा येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती सुमित्राबाई गोविंदराव पाटील आगलावे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
       मृत्युसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वर्ताळा ता. मुखेड येथे दिनांक १७ ऑक्टोबर रोज शनिवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
        सुमित्राबाई आगलावे यांच्या जात्यावरील ओव्या व नागपंचमीची गाणे  प्रसिद्ध होते. त्या चालीवरील लयबद्द गीतं गाताना ऐकण्याचा मोह अनेकांना आवरायचा नाही.  स्व. गोविंदराव आगलावे  यांच्या ‘गोविंदवाणी’ काव्यसंग्रहाच्या निर्मितीत सुमित्राबाई आगलावे यांचे भरीव योगदान राहिलेले आहे.
      त्या अशिक्षित असल्या तरी आपल्या मुला-मुलींना शिक्षण देऊन संस्कराचे धडे दिले. श्रीमती सुमित्राबाई आगलावे ह्या जेष्ठ ग्रामीण कवी स्व. गोविंदराव पाटील आगलावे यांच्या पत्नी तर   मंडळ अधिकारी अँड. प्रल्हादराव आगलावे, श्री संत माणिकराव महाराज सार्वजनिक वाचनालयाचे सचिव उत्तमराव आगलावे, मुखेड तालुका मराठी पत्रकार परिषद व  ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार दादाराव आगलावे, सौ. उज्वलाबाई तेलंग यांच्या मातोश्री तर के.प्रा.शाळा मुखेडच्या सहशिक्षिका सौ. शीला आगलावे (उबाळे) यांच्या सासूबाई होत.
       त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी, नातू,पतू असा मोठा परिवार आहे. श्रीमती सुमित्राबाई गोविंदराव आगलावे यांच्या निधनाबद्दल मुखेड तालुका पत्रकार संघ, सुप्रभात मित्रमंडळ,  ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आगलावे परीवारावर कोसळलेल्या दु:खाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.