बँकेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल   ; सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने केली तक्रार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजडशहरातील सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत युवकाने शाखा व्यवस्थापकास अश्लिल भाषेत शिविगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी युवकावर मुखेड पोलिसात शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन दि. १५  रोजी सायंकळी ६ च्या सुमारास  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी केरुर येथील युवक आकाश शिंदे हा दि. १५ रोजी दुपारी १.१० वाजता

बँकेत येऊन शाखा व्यवस्थापक शामकुमार शिराढोणकर यांना गंगाधर वाघमारे यांचे पिककर्जाचे काम का झाले नाही ? असे म्हणाला असता शाखा व्यवस्थापकांनी काम उदया होईल असे सांगितले असता शिंदे यांनी काम ताबडतोब का करत नाही असे म्हणत शाखा व्यवस्थापकांना अश्लिल व अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली सदर घटना बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समक्ष घडली अशी तक्रार शाखा व्यवस्थापक शामकुमार शिराढोणकर यांनी मुखेड पोलिसात दिली.

दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड पोलिसात आकाश शिंदे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश चित्ते हे करीत आहेत.