दलाली द्या,पीककर्ज मिळवा!, मुक्रमाबादच्या स्टेट बँकेत दलालांचा सुळसुळाट? शेतकरी संतप्त…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक अंतर्गत अनेक खेडो-पाडी गावांचा समावेश आहे. या ठिकाणाचे शाखाधिकारी हे दलालां मार्फत पैसे घेतल्याशिवाय पिककर्जाची फाईल हातातच घेत नाहीत,असा आरोप शेतक-यांतुन व्यक्त होत आहे. अगोदरच प्रत्येक शेतकर्यांना कागदपत्रे जोडण्यासाठी तालुक्यावरती खेटे मारून नाकी नऊ येत होते, आवश्यक कागदपत्रासह अनावश्यक कागदपत्रांची मागणी ही बँक करत होती व आता प्रत्येक फाईल मागे एक हजार रुपये हे बँकेचे दलाल मागणी करत आहे.

पीककर्ज मंजुर करण्यासाठी एका फाईल मागे 1,000 रू मागणी केली जाते, पैसे न दिल्यास ती फाईल धुळखात तिथेच पडलेली असते.

बँकेमध्ये कामासाठी काही युवक आहेत. त्या युवकांना हाताशी धरून बाहेरील काही दलाल हे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडुन वारेमाप लुट करत आहेत. शेतकऱ्यांना तुमची पीककर्जाच्या फाईलवरती सही करण्यासाठी त्वरीत बोलवु व तुम्ही पीककर्जाच्या फाईलवर सह्या केल्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पीककर्जाची रक्कम लवकरात लवकर जमा होईल असे सांगुन शेतकर्याकडुन फाईल मागे 1000 रू. हे एका फाईलसाठी उकळत आहे.

………………………………….

पिककर्ज मंजुरी साठी माझी फाईल सुद्दा स्टेट बँकेत पीककर्ज मिळवण्यासाठी फाईल दिलो आहे दिड महीना ऊलटला तरी अद्याप माझी फाईल सही करण्यासाठी साठी अजुन आली नाही. बँकेत विचारधारणा केली असता तुम्ही घरला जा आम्ही तुम्हाला फोनवरती कळवु म्हणुन दिवसेंदिवस ऊडवाऊडवीचे ऊत्तरे देत आहेत. बँकेचे काही यजंट आहेत की त्यांना फाईल मंजुरीसाठी प्रत्येक फाईल मागे एक हजार रूपये द्यावे लागतात. माझी पिकर्जाची फाईल मंजुर होणार नाही या भितीपोटी त्या शेतकऱ्यांनी नाव न लिहीण्याच्या अटीवरून ही सर्व सवीस्तर माहिती आमच्या लोकभारत न्युज च्या प्रतीनिधीनीशी बोलताना दिली.

—————————————-
आमच्या बँक अंतर्गत असा कोणताही यजंट नाही की,तो पैसे घेऊन पिककर्ज मंजुर करतो. बँकेमध्ये एकुण 2000 कर्ज खाते असुन केवळ 1200 खात्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे.पिककर्जाचे फाईल बँकेत दिलेल्या तारखेनुसार मंजूर करत नाही तर ज्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ झाले व कर्जमाफीची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली आहे अशांचेच आम्ही पिककर्ज मंजूर करत आहोत.
—————————————-
नवीन प्रजापती 
स्टेट बँक ऑफ इंडिया बँक मँनेजर मुक्रमाबाद