शासनाने केलेली मदत ही वेळेवर मिळेना..! गेले वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून चार गावे वंचित… शेतकऱ्यांचा आर्त टाहो…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

गेल्या वर्षी माहे आँक्टोंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आले असलेले पिक अतिवृष्टी मुळे पिक हातातुन गेले आहे. शासनाने केलेली मदत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहचत नाही.

सविस्तर माहिती अशी की, मुखेड तालुक्यातील सावरमाळ,सावळी,वंडगीर,वळंकी या चार गावातील शेतकऱ्यांना आँक्टोंबर 2019 ला झालेल्या अतिवृष्टी ने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाकडून अनुदान मंजूर झाले आहे. त्या अनुदानाचे पैसे तालुक्यात बरेच ठिकाणी वाटपही झाले आहे. तरी अद्यापही मंजुर झालेले दुष्काळी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. सावरमाळ,सावळी,वंडगीर,वळंकी या चार गावातील शेतकरी दुष्काळी अनुदान भेटेल कि नाही या चिंतेत आहेत.

सध्या कोरोणा महामारी व सोयाबीनची दुबार पेरणी, ढगफुटी अशा अनेक संकटामुळे शेतकरीराजा अडचणीत सापडला आहे.

—————————————-
जवळ जवळ एक वर्षाचा कालावधी लोटला गेला तरी अद्यापही चार गावे दुष्काळी अनुदानाच्या मदतीपासून वंचित आहेत. बँकेने शेतकऱ्यांविषयी तत्परता दाखवुन लवकरात लवकर उर्वरीत चार गावांचे अनुदान हे वाटप करावे. अन्यथा हे खपवुन घेतले जाणार नाही. शासनाने केलेली मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पोहोचत नाही असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ता.उपाध्यक्ष पप्पु पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.

—————————————-

अधीक माहिती साठी आमचे लोकभारत न्युज चे प्रतिनिधी पवन कँदरकुंठे यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक एम.पी.मुळशेटवार यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता, माझी सध्याला शाखा व्यवस्थापक म्हणून नवीन निवड झाली आहे. आमच्या बँक अंतर्गत एकुण 30 गावे आहेत. मी आल्यापासून 20 गावाचे अनुदान जलद गतीने वाटप केलेलो आहे. मी येण्या अगोदर केवळ 8 गावाचे दुष्काळी अनुदान हे वाटप झाले होते. सध्याला रावणकोळा ह्या गावाचे वाटप चालू आहे. उर्वरित चार गावांचे अनुदान हे 6-7 दिवसांमध्ये वाटप करू असे सांगितले.