महाज्योती संस्थेला १ हजार कोटी दया, रखडलेली मेगाभरती तात्काळ सुरु करा मुखेडात ओबीसी समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

महाज्योती संस्थेला १ हजार कोटी दया, रखडलेली मेगाभरती तात्काळ सुरु करा अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिलदार मुखेड यांच्या मार्फत दि. ०८ रोजी देण्यात आले.

या निवेदनात मराठा समाजास ओबीसीमध्ये समाविष्ठ करु नये,जातीनिहाय जणगनणा करावी,ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दयावे,न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ऑल इंडिया ज्युडीशरीसाठी केंद्र सरकारला शिफारस करावी,रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम देऊन वसतीगृह सुरु करावे, प्राध्यापक भरतीमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या रिझव्र्हेशन इन टिचर्स कॅडर अॅक्ट २०१९ कायदयावची अंमलबजावणी करावी,ज्या जिल्हयात ओबीसींना ६,९,११ व १४ टक्के वर्ग तीन व चारच्या पदाकरीता आरक्षण आहे अशा जिल्हयात ओबीसींना १९ टक्के आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


  यावेळी विश्वनाथ कोलमकर,संजय दुय्येवाड, शिवाजी कोणापुरे, सचिन रामदिनवार, ज्ञानेश्वर डोईजड, दिवाकर हाळदेकर, नामदेव चापलकर, सुरेश कोतवाले, बालाजी वाडेकर,हाणमंत श्रीमंगले, नामदेव यलकटवार,कैलास पोतदार,प्रकाश निमलवाड,डि जी फसमले,अनिल स्वामी,आनंद राठोड, शिवाजी मेकलवाड,दत्ता येवते,गंगाधर आकुलवाड यासह आदी समाज बांधव उपस्थित होते.