बार्‍हाळी स्टेट बँक आँफ इंडीया शाखेमधील एटीएम मशीन बँकेबाहेर बसवुन ग्राहकांसाठी २४ तास खुली करा .. ढोसणे यांची एसबीआय रिझनल मॅनेजरकडे मागणी…अन्यथा ढोल बजाओ आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
      स्टेट बँक आँफ इंडीया शाखा बार्‍हाळी येथील एटीएम मशीन ग्राहकासाठी चोवीस तास खुली करुन ती तात्काळ बँकेच्या बाहेर बसवावी अन्यथा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी नांदेड येथे रिझनल मँनेजर यांची भेट घेवुन निवेदनाद्वारे केली.
 बार्‍हाळी येथे मोठी बाजारपेठ असुन तेथील स्टेट बँक इंडीया शाखेचे लाखो खातेदार असुन तेथील एटीएम मशीन ही बँकेतच असल्याने तेथील ग्राहकांना यांचा नाहक ञास सहन करावा लागत असुन ग्राहकाकडे शाखेचे एटीएम असुन सुध्दा अन्य शाखेच्या एटीएमकडे वळावे लागत आहे.
एसबीआय बार्‍हाळी शाखेत बँकेतील कामासाठी आलेल्या ग्राहकांना ही तोच मार्ग व एटीएम धारकांनाही तोच मार्ग असल्याने एटीएम धारकांना  नाहक ञास सहन करावा लागत असुन तेथील मनमानी कारभारानेही डोके वर काढल्याने याकडेही लक्ष देण्याची मागणी ढोसणे यांनी रिझनल मँनेजर नांदेड यांच्याकडे केलीअसुन त्यावर रिझनल मँनेजर यांनी तात्काळ कार्यवाही करुन एटीएम लवकरच ग्राहकासाठी खुले होईल असे आश्वासन ढोसणे यांना दिले.यावेळी बालाजी पाटील सांगवीकर,श्रीकांत काळे उपस्थित होते.