आ. रातोळीकर यांच्या घरासमोर स्वाभिमानी संभाजी बिग्रेडचे ” मराठा” आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार –  आ.राम पाटील रातोळीकर

मुखेड  पवन जगडमवार 
   दि ६ आॅक्टोबर रोजी रातोळी येथे विधान परिषदेचे सदस्य मा.आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी संभाजी बिग्रेड च्या वतिने मराठा आरक्षण संदर्भातील विविध मागण्या घेऊन जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले.जोरदार घोषणा बाजी करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आले. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती लवकरात लवकर उठवून चालू असलेली.पोलीस व नौकर भरती थांबवावी. या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने  आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवास स्थानासमोर जागर आंदोलन करण्यात आले होते.
    मराठा आरक्षणाचा विषय सुप्रिम कोर्टात असून ,सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.त्यामुळे आमदारांनी सरकार तर्फे मा .सर्वोच्च न्यायालयात योग्य ती भुमिका मांडुन.मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे. तसेच मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले होेते.
 राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा.घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकरात लवकर घ्यावी. यासाठी अर्ज करावा. घटनापीठ स्थापन झाल्यानंतर स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत.हे सर्व शक्य नसेल तर मराठा आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा . तसेच मराठा आरक्षणावर दोन दिवस विशेष अधिवेशन घ्यावे.सारथी संस्था पूर्ववत सुरु करावी. आणि सारथीचे कामकाज कोर्सेस सुरु करण्यासाठी १००० कोटींचा निधी द्यावा.२२ जुलै २०२० पासून महाविकास आघाडी सरकारने परिपत्रक काढुन आर्थिकदृष्टया दुर्बल घटका करीता १० टक्के आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय घेतला होता.तो रद्द करुन त्यामध्ये मराठा समाजाला संधी द्यावी.
मराठा आरक्षणा बद्दल अध्यादेश निघेपर्यंत किंवा स्थगिती उठेपर्यंत मराठा मुला – मुलींच्या युवकांना नोकरीच्या ऑर्डर्स भेटल्या त्यांची नौकरी अबाधित ठेवावी.महाराष्ट्र शासनाची मराठा आरक्षणाबद्दल खरोखरच सकारात्मक भुमिका असेल तर मराठा आंदोलकावर दडपशाही पहारा ठेवून त्यांना त्रास देऊ नये ,अशी मागणी करण्यात आली.या सर्व मागण्या संदर्भातचे निवेदन आमदार राम पाटील रातोळीकर यांनी स्व:ता आंदोलन कर्त्यांशी भेटू निवेदन स्विकारले यावेळी स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे प्रदेश अध्यक्ष माधवराव पाटील देवसकर, प्रदेश कार्यकारी सदस्य मंगेश कदम,गजानन पा.माने,नांदेड जिल्हाध्यक्ष हाणमंत पा. वाडेकर,बाला पा.कदम,जिल्हाउपध्यक्ष यौगेश पा.जांबळीकर,सुनिल पाटील कदम,तिरूपती पा.भगनुरे,प्रदेश संघटक विलास पा.इंगळे,विद्यार्थी अघाडी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजुकर,छावा तालुकाअध्यक्ष विनायक पा.माहेगावकर,नागनाथ पा.बेळीकर अदिची प्रमुख उपस्थिती होती.