रोहित पवार विचार मंचाच्या तालुका अध्यक्षपदी निळकंठ जुन्ने तर सचिव पदी मनोहर नागराळे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : पवन जगडमवार :-

दि. २८ सप्टेंबर रोजी मुखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रोहित पवार विचार मंच ची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. व या बैठकित रोहित पवार विचार मंच ची मुखेड तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदसवार कैलास व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली व रोहित पवार विचार मंचाचे जिल्हाअध्यक्ष बालाजी पाटील सांगविकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हि कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

या कार्यकारिणी च्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी निळकंठ प्रल्हादराव जुन्ने पाटील बेळीकर,तर सचिव पदी मनोहर बाबूराव नागराळे चोंडीकर यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी पांडुरंग नामदेव वडजे व अंतेश्वर मोहनराव बनबरे,कार्याध्यक्ष पदी अमोल वाकोडे, सहसचिव पदी मारोती राजाराम कौडकावे व अंकुश प्रल्हादराव लुटे, प्रवक्ता पदी अविनाश सोपानराव इंगळे, सोशल मिडीया प्रमुख पदी अजित पाटील इत्यादींची निवड करून नविन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदसवार कैलास व्यंकटराव यांची प्रमुख उपस्थितीती होती. तसेच यावेळी रोहित पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, दत्ता पाटील इंगोले,जिल्हा सचिव गजानन पाटील होटाळकर,नांदेड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रेषित पाटील, राजमुद्रा जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष कपील पाटील जुनेकर, आनंद शिवाय सर, बालाजी पाटील ढोसणे, रमाकांत पाटील जाहुरकर, राम पाटील हिवराळे, संदीप पाटील पवळे, सुशील पाटील पवळे, माधव पाटील खतगावकर, आनंद पाटील इंगळे अदीचे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता पाटील इंगोले यांनी केले तर आभार अमोल वाकोडे पाटील यांनी केले. व सर्व नविन कार्यकारिणी ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.