पत्रकार पवन जगडमवार यांना कोळी राष्ट्रसंघ च्या वतिने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / प्रतिनिधी

कोरोना कोवीड १९ व लॉकडाऊन काळातील संकटमय काळात.कोवीड १९ वर मात करण्यासाठी निरपेक्ष भावनेने सामाजिकता जोपासण्यासाठी व मानवी सेवेसाठी स्वंयस्फूर्तीने सामाजिक व राष्ट्रीय कार्यास सहभाग घेऊन सिंहाचा वाटा उचललात. व आपल्या जिवाची पर्वा न करता.समाजाची वास्तव व विदारक परिस्थिती आपल्या पत्रकारितेतून सातत्याने लिखाण करून जगासमोर ठेवल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून. युवा निर्भीड पत्रकार दैनिक बालाघाटचा आवाज या वृत्तपत्राचे मुखेड तालुका प्रतिनिधी पत्रकार पवन जगडमवार यांच्या गुणाचा कर्तृव्ताचा आदर करून कोळी राष्ट्रसंघ च्या वतिने दि.२९ सप्टेंबर २०२० रोजी कोळी राष्ट्रसंघ चे संस्थापक अध्यक्ष मा. गोकुळ दादाकोळी ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.बळीराजे वाघमारे यांच्या वतिने कोरोना सेवा सन्मानपत्र बहाल करण्यात आले.

हे सन्मान पत्र कोळी राष्ट्रसंघ युवा जिल्हा उपआध्यक्ष नांदेड दत्ता भाऊ बापूने कलंबरकर यांच्या हस्ते कोरोणा योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार पवन जगडमवार हे पत्रकारिता क्षेत्रातील युवा पत्रकार निर्भीड व धाडशी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र परीचय आहे. विविध क्षेत्रांमध्ये ते सातत्याने भाग घेतात.त्याच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील व सामाजिक कार्याच्या कार्य कर्तृत्वामुळे त्याच नाव नेहमी तालुकाभरात लौकीक आहे.

आपल्या बुद्धीच्या जोरावर व लेखणीच्या माध्यमातून दैनिक बालाघाटचा आवाज या वृत्तपत्राच्या माध्यमातून नेहमी गोरगरीब ,कष्टकरी,कामगार ,श्रमीक ,विद्यार्थी,शेतकरी यांचे प्रश्न लावून धरून शासन दरबारी मांडून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत असतात. कोवीड १९ सारख्या महाबयंकर काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता. आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे मुख्य प्रश्न घेऊन लिखाण केले. त्यामुळे त्यांच्या लेखनाची व धाडसी वृत्तीची दखल घेऊन.कोळी राष्ट्रसंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पत्रकार पवन जगडमवार यांना कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.