मुखेडात दुय्यम निबंधकाच्या नजरेखाली शेतक­ऱ्यांची लुट..! बाँडला अव्वाच्या सव्वा रुपये घेतली जात असताना दुय्यम निबंधकांची बघ्याची भूमिका !!

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

सध्या पिककर्ज व इतर कामासाठी शेतक­ऱ्यांची बाँडची गरज भासत असते पण १०० रुपायांचा बाँड १३०  रुपयाला विकत दुय्यम निबंधकाच्या नजरेखाली शेतक­ऱ्यांची लुट चालु असताना दुय्यम निबंधक मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील महिण्यात बाँडच्या विक्रीबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने  तक्रार दिली असता मुखेडमधील सहा पैकी तीघांचे परवाने तीन महिण्याकरीता नांदेड  येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रद्द सुध्दा केले पण बाँडविक्री करणा­ऱ्यास सध्या तरी कोणताच फरक पडलेला दिसून येत नाही. तिघांचे परवाने रद्द झाल्याने  बाँडविक्री करणारे कुठेही  बसून अव्वाच्या सव्वा किंमतीत बाँड विक्री करत आहेत.

अगोदरच शेतक­ऱ्यांचे  दिवस हालअपेष्टांचे असताना त्यात पुर,अतिवृष्टी अशा अनेक संकटाततून शेतकरी जीवणाचा गाडा चालवित असताना दुय्यम निबंधक कार्यालयाकडून असा बॉडचा सर्रास काळा बाजार होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी लक्ष देऊन अधिका­यास बडतर्फ करण्याची मागणी शेतक­ऱ्यांतून होताना दिसत आहे.

…………… चौकट…………

याबाबत दुय्यम निबंधक अधिकारी पी.एस.उत्तरवार याची माहिती दिली असता तक्रार करा…कार्यवाही करु….अन्यथा बँकेचे चलन काढून कोषागार कार्यालयातून बाँड घ्या असे सांगितले. पण तक्रार करण्याऐवजी डोळयादेखत शेतक­ऱ्यांची लुट चालु असताना डोळे बंद करुन राहणे हे कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जात आहे.