वाळू माफीयांचे मुदखेड महसूल प्रशासनाला आव्हान ? कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे काय कार्यवाही करणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष्य….!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

नांदेड जिल्हा : विशेष प्रतिनिधी

मुदखेड परिसरात काही दिवसापूर्वी गोदावरीच्या नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू माफीयांनी शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करून साठवणूक केली असून या काळात उपसा केलेली शेकडो ब्रास वाळूचे मोठ-मोठे ढिगारे उभे करून वासरी,शंकतिर्थ शिवारात लपवण्यात आलेले आहेत.तसेच कार्यवाहीसाठी गेलेल्या महसूल प्रशासनाच्या कर्मचारी तसेच इतरांना अरेरावीची भाषा करण्यापर्यत मजल या वाळू चोरांची जाते आहे,यामुळे आता तालुक्यातील वाळू चोरांचा घोळ बंद करण्यासाठी कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश घोळवे यांच्यासारख्या कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची मुदखेडला गरज असल्याचे बोलले जात आहे.परिसरातील वाळू चोरांनी सरळसरळ तालुका महसूल प्रशासनापुढे ही आव्हान निर्माण केले असून परिसरात अवैधपणे शेकडो ब्रास वाळूचे ढिगारे असल्याचे निदर्शनास आणून दिलेले असताना सुध्दा तालुका महसूल प्रशासन संबंधितावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करू शकलेले नाही.यामुळे मुदखेड तालुका महसूल प्रशासन वाळू माफीयांसमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

 

यामुळे नुतन कर्तव्यदक्ष भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हेच आता वाळू चोरांना धडा शिकवतील अशी अपेक्षा तालुक्यातील सर्वसामान् नागरिकांना वाटत आहे.मुदखेड तालुक्यातील वासरी,शंकतिर्थ शिवारात मोठ्या प्रमाणात वाळूचे ढिगारे असून कर्तव्यदक्ष,कठोर अधिकारी म्हणून अोळख असणारे नुतन उपविभागीय अधिकारी राजेद्र खंदारे वाळू माफीयांवर परिसरातील वाळूच्या ढिगारांचा तात्काळ पंचनामा करुन कार्यवाही करतील अवैध वाळूचे ढिगारे जप्त करतील का असा सवाल बहुतांशी खेड्या पाड्यातील गोरगरिब,घरकुल लाभार्थी, शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.