स्वस्त धान्य दुकानात नांदेडमध्ये गहु एैवजी मक्का….. मक्याच काय करावं ? गोर गरीब नागरीकात संभ्रम खाता येईना अन् टाकुन देताही येईना !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

 

नांदेड : वैजनाथ स्वामी

नांदेड शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानात गरीबांना दिल्या जाणारे गहु एैवजी मक्का दिला जात असुन खाता ही येईन अन् टाकुन देताही येईना अशी अवस्था झाल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत.

आधीच कोरोनाच्या संकटात हाताचे काम गेले अन शेतातील होते नव्हते पिकही वाया गेले पण आता सरकारने सुध्दा गरीबांची थट्टा करीत निकृष्ट दर्जाचे मक्का स्वस्त धान्य दुकानातून राशनकार्ड लाभार्थ्यांना दिले असुन नागरीकांत यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

याबाबत लाभार्थ्यांनी दुकानदारास विचारले असता वरुनच हे धान्य आल्यामुळे आम्हास दयावे लागत असुन आम्हाला काहीही करता येत नाही असे उत्तर दिले. मक्याची रोटीही करता येत नाही याचा वापर अनेक शेतकरी जनावरांना खाद्य म्हणुन करत असतात.