मुखेडात अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे धरणे आंदोलन २२ ते २७ सप्टेंबर पर्यंत जिल्हाभर करणार आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड    :  शेतीमालाला हमी भाव द्या, जमिन हक्क, मनरेगा कामांना मान्यता व सर्व प्रकारची कर्ज माफ करा या प्रमुख मागणी बरोबरच सर्वसामान्य जनता, गरिब, शेतमजूर व शेतक-यांसाठी  महत्वपुर्ण असलेल्या इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान मजदूर सभा अंतर्गत जमीन हक्क संघर्ष कृती समिती च्या वतीने दि.१८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनानुसार दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंंदोलन करण्यात आले.

       निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे-
(१) गेल्या १५ दिवसांच्या सततधार पाऊस व अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे तात्काळ अोला दुष्काळ जाहिर करा, (२) प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत शेतीशी निगडित सर्व कामे कृषीमाल प्रक्रिया, कुकुटपालन इ. कामे मनरेगा निधीतून चालू करा, (३) कच्चा मालाच्या ७५% प्रमाणे कापड्याच्या तुलनेने कापसाला ७५,०००/- व सोयाबीनला ६३५० प्र.क्विंटल प्रमाणे भाव द्या, (४) नवीन पिककर्ज तात्काळ वाटप करा, (५) गायरान जमीन, वनजमीन, देवस्थान जमीन, मसुरा जमीन, सरकारी सहकारी, बेवारशी जमीनीचे भुमिहिनांना तात्काळ वाटप करा, (६) शेतकरी, शेतमजूर, दलित,आदिवासी यांचे बँकेचे, फायनान्स, सावकारी, मायक्रो फायनान्स, बचत गटांचे कर्ज व गृहकर्ज तात्काळ माफ करा या मागण्या असून या मागण्या तात्काळ पुर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला. या धरणे आंदोलनात “इन्कलाब जिंदाबाद..! अखिल भारतीय किसान मजदूर सभा जिंदाबाद..! जमीन हक्क संघर्ष कृती समिती जिंदाबाद..!अाॅनलाईन शिक्षण पद्धत बंद करा..!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी काॅ.अशोक घायाळे, काॅ.रंगनाथ भालेराव, काॅ.सदानंद गायकवाड, काॅ.जयसिंग कांबळे, काॅ.रामेश्वर घायाळे, काॅ.मानेजी टी.पाटील, काॅ.दिलीप पाटील यांच्यासह काॅ.वासमवाड पी.डी., काॅ.बालाजी लघुळे, काॅ.लक्ष्मण केशमोडे, काॅ.मष्णाजीराव गायकवाड, काॅ.अनिल घायाळे आदींची उपस्थिती होती.