अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेच्या वतीने वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज व श्री गुरू बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव यांना श्रध्दांजली वाहीली झुम मिटींग व्दारे राज्यभरातील तमाम शिवाचार्यांनी दिली मानवंदना

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड : तमाम वीरशैव लिंगायत समाजाचे वंदनीय गुरू वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे शिवऐक्य झाले त्यांच्या जान्याने वीरशैव लिंगायत समाजाचे भरून न येनारे नुकसान झाले आहे.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे दैवी पुरूष होते आपले आयुष्य चंदनासारखे झिजवून समाजाला समतेचा,शांतीचा उपदेश दिला व संघटीत राहन्याची शिकवन वंदनीय अंप्पानी दिली आहे.
देशभरात सर्वत्र अप्पांना श्रध्दांजली समर्पीत केली जात आहे.

आज समस्त शिवाचार्य यांच्या संघटनेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमाचे पालन करून झुम मिटींग प्रणालीचा अवलंब करत भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली.या वेळी संघटनेचे अध्यक्ष ष.ब्र.श्री १०८ डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांनी अप्पा विषयी आपले दुख:द मनोगद व्यक्त करताना भावना अनावर झाल्या होत्या प.पु.अप्पांनी आपले संपुर्ण जीवन हे समाज संघटनेसाठी समाज प्रबोधनासाठी धर्म जागृती करून चंदनरूपी देह झिजवला आहे.अप्पांचे कार्य हे शब्दात व्यक्त करता येने अश्यक्य आहे.कपिलधार पदयात्रेच्या माध्यमातुन असो वा श्रावणमास अनुष्ठान सांगता कार्यक्रम विविध धर्मकार्यातुन लाखो भक्तांना संघटीत केले.त्यांच्या पश्चात आम्ही सर्वच हतबल आहोत असे शिवाचार्य संघटनेच्या अध्यक्षांनी आपली भावना व्यक्त केली.

संघटनेचे सचिव ष.ब्र.श्री १०८ महादेव शिवाचार्य महाराज यांनी आपले भावनीक मनोगत व्यक्त करताना प.पु.अप्पांच्या आठवनी व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना संत शिरोमनी मन्मथ स्वामी यांचे नंतर साडेचारशे वर्षानंतर परमरहस्य ग्रंथाला सर्व समाजा पर्यंत पोहचवीन्याचे महान कार्य डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.प्रती मन्मथ स्वामीचा अवतारच होते अप्पा, निश्वार्थ परमार्थाचा मार्ग दाखवीनारे दैवी पुरूष पुन्हा होने नाही असे मनोगत व्यक्त केले.
झुम मिटींगच्या माध्यमातुन श्रध्दांजली समर्पीत करण्यासाठी सोलापुरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी,म्हाडेकर शिवाचार्य महाराज,वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत,श्री गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी,राचलिंग शिवाचार्य महाराज परांडकर,गिरगावकर शिवाचार्य यांनी देखील श्रध्दांजली अर्पण केली व आपले मनोगत व्यक्त केले.