पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्यात यावे – कृषि व पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब रावणगांवकर

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मराठवाडा

नांदेड, दि. 19 :- शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे काढणीच्यावेळी योग्य प्रकारे हाताळणी व साठवण करुन पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्याचे आवाहन कृषि व पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब किशनराव रावणगांवकर केले आहे.

जिल्हयात सर्वाधिक सोयाबीन पिक पेरणीक्षेत्र असून सोयाबीन पिकाखाली 3 लाख 81 हजार 518 हे. क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळी अवेळी पावसामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील उच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे स्थानिक पातळीवर जतन करुन पुढील खरीप हंगामासाठी त्याचा वापर करावा असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.