मूग, उडीद,सोयाबिन हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी – जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील़

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड, दि. 19 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये नाफेडच्यावतीने मूग, उडीद, सोयाबिन खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, सुधीर पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात नांदेड {अर्धापूर}, मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली {कासराळी}, देगलूर याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे. खरीप हंगाम 2020-21 करीता प्रतिक्विंटल मूग-7 हजार 196 रुपये तर उडीद- 6 हजार रुपये तर सोयाबिन -3 हजार 880 रुपये हमी भावाने असणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन, या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.